चीन सीमेवर भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन! ‘बुलंद भारत’चा हाय अल्टिट्यूड आर्टिलरी रेंजवर विशेष सराव

सीमारेषेवरील विविध भागात चीन नेहमीच घुसखोरीचा प्रयत्न करत असतो, मात्र भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते.

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : चीनच्या सीमेजवळ भारतीय लष्कराने आपला पराक्रम दाखवला आहे. ईस्टर्न थिएटरने नॉर्थ ईस्टमधील हाय अल्टिट्यूड आर्टिलरी रेंजमध्ये विशेष सराव केला आहे. चीनच्या डावपेचांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) उंच आणि दाट टेकड्यांमध्ये हा सराव पूर्ण झाले.  Integrated surveillance and firepower training exercise Buland Bharat conducted in High altitude artillery ranges in Eastern command

सीमेवर भारताचा चीनसोबतचा तणाव कायम आहे. एलएसी वरील विविध भागात चीन वेळोवेळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. काही महिन्यांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय जवानांनी तेथून चिनी सैनिकांना पळवून लावले. अशाप्रकारे बुलंद भारत सरावातून भारताला चीनला थेट आणि स्पष्ट संदेश द्यायचा आहे.

अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग आणि तवांग जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आलेल्या विमान वाहतूक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या विशेष दलाच्या संयुक्त विद्यमाने हा सराव म्हणजे आर्टिलरी आणि इन्फंट्रीच्या पाळत ठेवण्याचे आणि अग्निशक्‍तीचे अचूक प्रात्यक्षिक होते. या विशेष प्रशिक्षणात युद्धभूमीवर शत्रूचा नायनाट करणे, तसेच निवडक लक्ष्यांवर तोफखाना, गन आणि इन्फंट्री फायर सपोर्टसह गोळीबार करणे आदी शिकवण्यात आले.

Integrated surveillance and firepower training exercise Buland Bharat conducted in High altitude artillery ranges in Eastern command

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात