मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी निष्पाप हिंदूंना अडकवले, मुख्यमंत्री योगींची काँग्रेसवर टीका

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : काँग्रेस आणि समाजवादी पक्षांसारखे पक्ष राष्ट्रप्रेमी लोकांना कायमच अडकवण्याचा कट रचतात. मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात निष्पाप हिंदूंना गोवण्यात आले. तर दहशतवाद्यांना वाचवण्यात आले. आज तेच लोक देशातील संविधानिक यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करत आहेत, असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र योगी आदित्यनाथ यांनी आज मेरठ येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर टीका केली आहे. सपा आणि काँग्रेसचे राजकारण हे केवळ जातीयवाद, दंगली आणि माफियांची पूजा करण्यापुरते मर्यादित आहे. योगी आदित्यनाथ यांनी मालेगाव बॉम्ब प्रकणावरून सपा आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले, मालेगाव बॉम्बस्फोट घटनेत निष्पाप हिंदूंना अडकवून राष्ट्रप्रेमी नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाबाबत त्यांचे मवाळ धोरण, जातीच्या आधारावर समाजचे विभाजन करण्याची त्यांची रणनीती देशासाठी घातक आहे.

माझ्यावर नरेंद्र मोदी, मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, सुदर्शन, इंद्रेश, रामजी माधव यांची नावे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. मी जर यांचे नाव घेतले तर ते मला मारणार नाहीत असे ते मला सांगत होते. माझ्याकडून त्यांची नावे वदवून घेण्यासाठी मला त्रास दिला जात होता.

मला ते खोटे बोलण्यास सांगत होते, असा आरोप भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांनी केला आहे. माझा तुरुंगात माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. कठोर छळ करून त्यांना हवे तसे त्यांनी मला बोलायला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मी खोटे बोलले नाही, असेही त्यांनी सांगितले.

Innocent Hindus were trapped to save terrorists in Malegaon bomb blast case, Chief Minister Yogi adityanath criticizes Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात