वृत्तसंस्था
मुंबई : दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये H3N2 विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.Influenza H3N2 threat rises in country : 9 deaths so far; Chief Minister Shinde will hold a meeting today
त्याचबरोबर या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत येथे विषाणूचे 352 रुग्ण नोंदवले गेले आहेत. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मुंबईत 32 रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी 4 एच3एन2 आणि 28 एच1एन1 रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. राज्यात इन्फ्लूएंझा H3N2 चा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत उपस्थित राहणार आहेत.
देशभरात खबरदारीचे उपाय…
गुजरातमधील वडोदरा येथे याच विषाणूमुळे 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. याला अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. दिल्लीच्या LNJP हॉस्पिटलमध्ये 20 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. येथील नवीन प्रकरणे पाहता बेड आणि डॉक्टरांची सुविधा वाढविण्यात येत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून पुद्दुचेरीतील सर्व शाळा 16 ते 26 मार्च या कालावधीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. बुधवारीही आसाममध्ये H3N2 विषाणूचा एक रुग्ण आढळून आला आहे.
महाराष्ट्रात दोन जणांचा मृत्यू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्रात या विषाणूमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी अहमदनगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण गेल्या आठवड्यात मित्रांसोबत फिरायला अलिबागला गेला होता. तेथून परतल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली होती.
महाराष्ट्रातील रुग्णालये सतर्क
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, H3N2 विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. H3N2 हा विषाणू जीवघेणा नसून तो उपचाराने बरा होऊ शकतो, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. H3N2 विषाणूसंदर्भात गुरुवारी बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App