विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसर्गाच्या काळात उद्योगांनी मदतीचा हात पुढे करत मास्कपासून ऑक्सिजन अशा अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या. विकासात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. सरकार आणि उद्योगजगत यांच्यातील सहकार्य दृढ होत असून त्यामुळे आर्थिक विकासाचा वेगही वाढत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. Industry plays important role in nations development – PM Modi
भारतीय उद्योग परिषदेच्या (सीआयआय) वार्षिक बैठकीत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले,‘‘उद्योग क्षेत्रातील सर्व मित्र आणि संघटना या भारताच्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचे घटक आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची चक्रे पुन्हा वेगाने फिरू लागली आहेत. आता नव्या जगाच्या बरोबरीने विकास घडवून आणण्यासाठी देशाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी उद्योगपूरक वातावरण तयार करण्याचा प्रयत्नही सुरु आहे. पूर्वी परकी गुंतवणूकीला दोन हात दूर ठेवणाऱ्या भारतात आता अशा गुंतवणकीचे स्वागत होते आहे. कोरोना काळातही अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत.’’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App