एव्हिएशन इंडस्ट्रीमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा सौदा! इंडिगो एअरलाइन्स तब्बल ५०० ‘एअरबस’ खरेदी करणार

ही विमानं २०२० ते २०३५ या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  इंडिगो नावाने खासगी विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी विमान वाहतूक संचलित करणारी इंटरग्लोब एविएशनने एव्हिएशन इंडस्ट्रीमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा सौदा  केला आहे. इंडिगो एअरलाईन्स तब्बल ५०० नव्या एअरबस A320 फॅमिली एअरक्रॉफ्टची खरेदी करणार आहे. IndiGo places an order for 500 Airbus A320 Family aircraft

कोणत्याही भारतीय एअरलाइन्स कंपनीकडून एकदाच दिली गेलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर ठरली आहे. ही विमानं २०२० ते २०३५ या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे.

वृत्तानुसार, इंडिगो बोर्डाने ५० अब्ज डॉलर्स किमतीच्या विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर इंडिगो ही विमानं खरेदी करणारी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. विमान वाहतूक कंपनीच्या वतीने या कराराची माहिती देताना असे सांगण्यात आले आहे की, इंडिगोने ५०० एअरबस A320 फॅमिली विमानांची ऑर्डर दिली आहे. २०३० ते २०३५ दरम्यान विमानांच्या वितरणानंतर या ऑर्डरमुळे एअरलाइन्सला स्थिरता मिळेल. इंडिगो ५०० विमानांची ही ऑर्डर केवळ इंडिगोची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर नाही, तर एअरबससोबत कोणत्याही एअरलाइन्सद्वारे आतापर्यंतची सर्वात मोठी एकल विमान खरेदी आहे.

IndiGo places an order for 500 Airbus A320 Family aircraft

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात