विमान कोचीहून दिल्लीला जात होते; कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही
विशेष प्रतिनिधी
नागपूर – IndiGo flight विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले..IndiGo flight
अधिक माहितीनुसार, इंडिगोचे विमान ६ई २७०६ कोचीहून दिल्लीला निघाले होते. दरम्यान विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पोलिस आणि अग्निशमन दल विमानाची कसून तपासणी करत आहेत. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. विमानातून आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
यापूर्वी, सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणारे एअर इंडियाचे विमान मंगळवारी सकाळी कोलकाता येथे उतरवण्यात आले. या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाला, ज्यामुळे सर्व प्रवाशांना विमानातून उतरावे लागले. तर एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनरमध्ये देखील सोमवारी तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता, ज्यामुळे फ्लाइट AI 315 सोमवारी दिल्लीला उड्डाण केल्यानंतर लगेचच हाँगकाँगला परतली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App