इंडिगोने या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये लँडिंग करताना गुरुवारी (१५ जून) इंडिगोच्या विमानाला ‘टेल स्ट्राइक’चा फटका बसला. बंगळुरू ते अहमदाबाद प्रवास करून हे विमान सुरक्षितपणे उतरले आणि ग्राउंडेड घोषित करण्यात आले आहे. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इंडिगोने या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. IndiGo flight hit by tail strike during landing in Ahmedabad
इंडिगोने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, बंगळुरूहून अहमदाबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाला 6E6595 अहमदाबादमध्ये लँडिंग करताना टेल स्ट्राइकचा फटका बसला. आवश्यक मूल्यांकन आणि दुरुस्तीसाठी हे विमान अहमदाबाद विमानतळावर उतरवण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांकडून या घटनेची चौकशी सुरू असल्याचे विमान कंपनीने सांगितले.
दिल्ली विमानतळावरही अशीच घटना घडली –
नुकतीच अशीच आणखी एक घटना इंडिगोच्या विमानासोबत घडली होती. ११ जून रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना इंडिगो विमानाचा मागील भाग जमिनीवर आदळला होता. यानंतर विमान वाहतूक सुरक्षा नियामक DGCA ने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, डीजीसीएच्या आदेशानुसार, विमान कंपनीने क्रू मेंबर्सनाही उड्डाण करण्यास मनाई केली आहे. इंडिगोने एका निवेदनात या घटनेला दुजोरा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App