जाणून घ्या नेमकं असं का घडलं आणि पुढे काय झालं?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमृतसरहून अहमदाबादला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान खराब हवामानामुळे पाकिस्तानमधील लाहोरजवळ पोहचले आणि भारतीय हवाई हद्दीत सुरक्षितपणे परतण्यापूर्वी गुजरांवाला पोहोचले. रविवारी प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या एका बातमीत ही माहिती देण्यात आली आहे. IndiGo flight from Amritsar to Ahmedabad reached Pakistan
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, फ्लाइट रडारनुसार, 454 नॉट्सच्या वेगाने उडणारे भारतीय विमान शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता उत्तर लाहोरमध्ये दाखल झाले आणि रात्री 8.15 वाजता भारतात परतले. याबाबत विमान कंपनीकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
बातम्यांनुसार, नागरी विमान वाहतूक प्राधिकरण (CAA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की हे असामान्य नाही, कारण खराब हवामानाच्या बाबतीत ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर परवानगी’ आहे.
विशेष म्हणजे, मे महिन्यात पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन (पीआयए) चे एक विमान भारतीय हवाई हद्दीत घुसले होते आणि सुमारे 10 मिनिटे तिथेच होते. PK248 हे फ्लाइट ४ मे रोजी मस्कतहून परतत होते आणि लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. मात्र, मुसळधार पावसामुळे बोईंग ७७७ विमानाच्या पायलटला तसे करणे कठीण जात होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App