Strategic Balance : भारताने अमेरिकेशी संरक्षण सामग्री करार चर्चा थांबवली नाही, पण मोदी – पुतिन यांच्यातही चर्चा!!

नाशिक : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दररोज संजय राऊत यांच्यासारखी बडबड करून आंतरराष्ट्रीय संबंधांमधल्या गंभीर चर्चेची चव घालवली असली, तरी भारताने मात्र आपले आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढते महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन Strategic Balance टिकवून ठेवण्यासाठी पावले उचलली. एकाच दिवशी भारताने अमेरिकेशी असलेल्या संबंधांबाबत महत्त्वाचा खुलासा केला, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. सध्याच्या जागतिक अस्थिर वातावरणात भारताचा Strategic Balance टिकवून धरला. Modi – Putin

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होण्यात अडचणी आणि अडथळा निर्माण झाला असला, तरी अमेरिका भारताचे सामरिक महत्त्व विसरलेला नाही. भारताचे सामरिक आणि राजनैतिक महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन अमेरिका भारताशी संबंध वृद्धिंगत करते आहे, असे वक्तव्य अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले.

त्या पाठोपाठ भारताच्या संरक्षण मंत्रालयाने देखील प्रतिसादात्मक वक्तव्य जारी केले. भारताने अमेरिकेशी संरक्षण सामग्री कराराची चर्चा थांबवलेली नाही. विविध संरक्षण सामग्री खरेदीची प्रक्रिया आणि चर्चा आपल्या पद्धतीने आणि गतीने सुरू आहे. भारताने अमेरिकेशी संरक्षण सामग्री कराराची चर्चा थांबविल्याच्या बातम्या कपोलकल्पित आणि खोट्या आहेत, असा स्पष्ट खुलासा भारतीय संरक्षण मंत्रालयाने केला.



– मोदी + पुतिन चर्चा

त्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून बातचीत केली. त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. भारत आणि रशिया यांच्यात ऐतिहासिक सामरिक आणि राजनैतिक संबंध आहेत. ते अधिक वृद्धिंगत करण्याबद्दल दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाली. पुतिन यांनी मोदींना रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाच्या सद्यस्थितीची वास्तववादी माहिती दिली. मोदींनी दोन्ही देशांना लवकरात लवकर युद्ध थांबून चर्चा करायचा पक्ष उचलून धरला.

– Strategic Balance

भारताने एकाच वेळी अमेरिकेशी सामरिक आणि राजनैतिक संबंधांवरची चर्चा आपल्या गतीने सुरू ठेवली, तर त्याचवेळी रशिया आणि भारत यांच्यातील सामरिक आणि राजनैतिक संबंधांची व्यापकता वाढवायचा निर्णय घेतला. जागतिक राजकारणातल्या अस्थिर वातावरणामध्ये भारताने strategic balance साधायचा कृतिशील प्रयत्न केला.

– मोदींचा जपान + चीन दौरा

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत सहभागी होणार असून ते 31 ऑगस्टला जपान दौऱ्यावर पण जाणार आहेत. या दौऱ्यात भारत – जपान द्विपक्षीय करार होणार आहेत. जपान दौऱ्यानंतर मोदी चीनला पोहोचतील, त्यावेळी भारताचे जगातल्या सगळ्या महासत्तांशी सत्ता संबंधांमधले वर्तुळ‌ सांधले गेले असेल. QUAD आणि BRICS मधला सत्ता समतोल राखण्यासाठी भारताची ठाम भूमिका अधोरेखित झाली असेल. या सगळ्यात कोण कुणापुढे झुकला, या माध्यमांमधल्या बातांपेक्षा भारताने वेगळे आणि अधिक महत्त्वाचे पाऊल टाकले असेल.

India’s strategic balancing act, defence purchase discussion on with US; Modi – Putin phone call

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात