विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर; चाहत्यांमध्ये धाकधूक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून भारताचा पहिला सामना मेलबर्न येथे पाकिस्तानबरोबर होणार आहे. हा सामना चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. India’s first match in the World Cup With Pakistan; Excitement among the fans

गेल्या वर्षी स्पर्धत पहिल्या सामन्यात भारताचा पराजय झाला होता. यंदाची स्पर्धा ऑस्ट्रेलियात पार पडणार असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यंदाच्या टि २० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी खेळवले जाणार आहेत.



भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह सुपर १२मध्ये आहे. तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ पहिल्या टप्प्यास पात्र होण्यासाठी आमनेसामने असतील. निवडलेल्या दोन संघांना सुपर १२ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

भारताचा पहिला सामना २३ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. दुसरा सामना २७ ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्या समवेत होईल, ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा, त्यानंतर चौथा सामना २ नोव्हेंबर रोजी बांगलादेशशी आणि पाचवा सामना ६ नोव्हेंबर रोजी गट ब विजेत्यासह होईल. अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. तर, उपांत्य फेरीचे सामने ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड ओव्हल येथे होणार आहेत.

India’s first match in the World Cup With Pakistan; Excitement among the fans

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात