RBI Governor Sanjay Malhotra : भारताची अर्थव्यवस्था जागतिक विकासाचा कणा, ‘डेड इकॉनॉमी’ टिप्पणीवर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा ट्रम्प यांना चोख प्रतिवाद

RBI Governor Sanjay Malhotra

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : RBI Governor Sanjay Malhotra   अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला “डेड इकॉनॉमी” म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भारताची अर्थव्यवस्था सध्या जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून, जागतिक विकासात भारताचे योगदान अमेरिकेपेक्षा अधिक आहे. RBI Governor Sanjay Malhotra

“भारत सध्या जागतिक जीडीपी वाढीत सुमारे १८% योगदान देतो, जे अमेरिका (११%) पेक्षा अधिक आहे,” असे मल्होत्रा यांनी आरबीआय मुख्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, “आपली अर्थव्यवस्था सशक्त असून, चालू आर्थिक वर्षात ६.५% वाढीचा अंदाज आहे, तर IMF ने जागतिक वाढीचा दर फक्त ३% असा सांगितला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या आपण ७.८% दराने वाढ केली आहे आणि यापुढेही ही गती टिकवणं आपलं ध्येय आहे.” RBI Governor Sanjay Malhotra



ट्रम्प यांच्या आरोपांना उत्तर देताना संजय मल्होत्रा यांनी भारताच्या मजबूत आर्थिक कामगिरीचा दाखला दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताची अर्थव्यवस्था केवळ जिवंतच नव्हे, तर जागतिक विकासाचा कणा बनली आहे.

ट्रम्प यांनी भारताच्या रशियासोबतच्या इंधन व्यवहारावरून भारतावर २५% आयात शुल्क लावण्याची धमकी दिली होती. यावर प्रतिक्रिया देताना मल्होत्रा म्हणाले,
“अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयाचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही. आम्ही आशावादी आहोत की हा मुद्दा परस्पर संवादातून सोडवता येईल.”

१ ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी भारतावर तीव्र टीका केली होती. त्यांनी लिहिले होते की, “भारत आमचा मित्र असला तरी त्याने रशियाकडून सातत्याने संरक्षण सामग्री आणि इंधन खरेदी केली आहे. आता भारत २५% टॅरिफ आणि रशियाशी व्यवहार केल्याबद्दल अतिरिक्त दंड भरणार आहे.”

या वक्तव्यावर देशात राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्रम्प यांच्या विधानाचे समर्थन करत म्हटले,”मला आनंद आहे की ट्रम्प वास्तव बोलले.”

त्यावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे “स्वदेशी”चा मंत्र देत उत्तर दिले आणि भारतीय अर्थव्यवस्थेची सकारात्मक बाजू अधोरेखित केली.

India’s economy is the backbone of global development, RBI Governor Sanjay Malhotra’s befitting reply to Trump on ‘dead economy’ comment

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात