भारतातील कोरोना लसीचे प्रमाणपत्र चालणार ९६ देशांमध्ये

भारतात घेतलेल्या कोरोना लसीचे प्रमाणपत्र जगातील ९६ देशांमध्ये चालणार आहे. जगातील ९६ देशांनी आपापसात एकमेकांच्या कोरोना लसीच्या प्रमाणपत्रांना मान्यता देण्याचे ठरविले आहे. या निर्णयामुळे भारतातील लस घेतलेल्यांना या ९६ देशांत जाणे सुलभ होणार आहे. तसेच या ९६ देशांतील लोक भारतात तसेच आपापसात प्रवास करू शकतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी ही माहिती दिली.India’s corona vaccine certification will be permitted in 96 countries


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात घेतलेल्या कोरोना लसीचे प्रमाणपत्र जगातील ९६ देशांमध्ये चालणार आहे. जगातील ९६ देशांनी एकमेकांच्या कोरोना लसीच्या प्रमाणपत्रांना मान्यता देण्याचे ठरविले आहे. या ९६ देशांतील लोक भारतात तसेच भारतातील लोक या देशांत प्रवास करू शकतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

जगातील अन्य देशांनीही भारताच्या लस प्रमाणपत्राला मान्यता द्यावी, यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. या प्रमाणपत्राला मान्यता मिळाल्यास शिक्षण, व्यवसाय, रोजगार. पर्यटन यासाठी प्रवास करणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. भारताचे प्रमाणपत्र आता ९६ देशांमध्ये चालणार असले तरी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ज्या लसीला परवानगी दिली आहे, त्याच लसीचे प्रमाणपत्र अन्य देशांत जाण्यासाठी चालेल.


Corona vaccination : कोरोनाविरोधी लसीचे १०० कोटी डोस देण्याचा टप्पा आज ओलांडण्याची शक्यता; मंगळवार अखेर दिले ९९ कोटी डोस


कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना या ९६ देशांमध्ये जाता येईल. कोवॅक्सिनबाबतही तशी मान्यता सर्व देशांनी द्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोवॅक्सिनला दोनच दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. ती मिळाल्याने ती लस घेतल्याचे प्रमाणपत्र आता ब्रिटनमध्येही चालू शकेल. परराष्ट्र मंत्रालय व आरोग्य मंत्रालय अन्य देशांच्या सतत संपर्कात असून, त्यामुळे भारतात येणारे व भारतातून अन्य देशात जाणारे यांचा फायदा होईल, असे मांडविया यांनी सांगितले.

या ९६ देशांमध्ये अमेिरका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, बांग्लादेश, फिनलँड, स्पेन, तुर्कस्थान, रशिया, मॉरिशस, यूएई, स्वित्झर्लंड, स्वीडन, ऑस्ट्रिया, ओमान, कुवेत, बहारीन, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, फिलिपिन्स, जमाईका, जॉर्जिया, श्रीलंका आदींचा समावेश आहे.

India’s corona vaccine certification will be permitted in 96 countries

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात