वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने अग्नी प्राइम या नव्या पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक लक्ष्ये नष्ट करू शकते. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 2000 किमी आहे.India’s Agni Prime Ballistic Missile successfully test fired, 2000 km range, capable of destroying multiple targets simultaneously
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी विकास चाचण्यांनंतर हे पहिले प्री-इंडक्शन रात्रीचे प्रक्षेपण होते. असे प्रक्षेपण प्रणालीच्या अचूकतेची आणि विश्वासार्हतेची पुष्टी करते.
मंत्रालयाने सांगितले की, ही चाचणी 7 जूनच्या रात्री करण्यात आली. रडार, टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टिम यासारखी उपकरणे जहाजांवर उड्डाणाचा डेटा कॅप्चर करण्यासाठी विविध ठिकाणी तैनात करण्यात आली होती. डीआरडीओ आणि स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही चाचणी पाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीसाठी डीआरडीओ आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले.
सशस्त्र दलात सामील होण्याचा मार्ग मोकळा
डॉ. समीर व्ही. कामत, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष यांनी डीआरडीओ प्रयोगशाळांच्या पथकांचे आणि चाचणीत सहभागी झालेल्यांचे कौतुक केले. DRDO आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यशस्वी उड्डाण चाचणी पाहिली. या चाचणीच्या यशानंतर या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा सशस्त्र दलात समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App