केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी दूरसंचार टॉवरच्या परवानगीसाठी २२० दिवस लागायचे, पण आता फक्त ७ दिवस लागतात. भारताचे 5G रोलआउट जगातील सर्वात वेगवान आहे. सहा महिन्यांच्या अल्प कालावधीत १,१५,०० साइट्स 5G सिग्नल प्रसारित करत आहेत. अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. Indias 5G rollout is among the fastest in the world Union Communications Minister Ashwini Vaishnaw
एरिक्सन ग्लोबलच्या सीईओच्या मते भारत या वर्षाच्या अखेरीस 5G रोलआउट स्पीडमध्ये सर्वात आघाडीवर असेल, असं म्हटलेलं आहे. एकहोल्म यांनी एका मुलाखतीत भारताच्या 5G रोलआउट स्पीडची प्रशंसा केली. भारतात मोठ्या प्रमाणात टॉप सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
ओसामा बिन लादेनचा फोटो कार्यालयात लावून ‘उत्कृष्ट अभियंता’ म्हणणं भोवलं; विद्यूत विभागातील SDOची नोकरीवरून हाकलपट्टी!
तर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, भारताने देशभरातील ४३३ जिल्ह्यांमध्ये १ लाखांहून अधिक 5G टेलिकॉम साइट्स स्थापित केल्या आहेत, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.
A few years ago, a permit for a telecom tower used to take 220 days, but today it takes only 7 days… India's 5G rollout is among the fastest in the world & within a short time frame of 6 months, we've 1,15,000 sites radiating 5G signals: Union Communications Minister Ashwini… pic.twitter.com/0Xch2zcg2K — ANI (@ANI) March 22, 2023
A few years ago, a permit for a telecom tower used to take 220 days, but today it takes only 7 days… India's 5G rollout is among the fastest in the world & within a short time frame of 6 months, we've 1,15,000 sites radiating 5G signals: Union Communications Minister Ashwini… pic.twitter.com/0Xch2zcg2K
— ANI (@ANI) March 22, 2023
भारत देश हा सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहेत. तसेच देशभरात सध्या अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपली 5G सर्व्हिस सुरु केली आहे. देशाच्या अनेक शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरु झाले आहे. सध्या नेटवर्क स्पीड टेस्ट साईट असणाऱ्या Ookla च्या नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये भारतात 5G सर्व्हिस अत्यंत वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारताची स्थिती मजबूत होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App