Israel : इस्रायलसोबतच्या तणावादरम्यान भारतीय युद्धनौका इराणमध्ये पोहोचल्या!

Israel

भारताच्या या मुत्सद्देगिरीची चर्चा का?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Israel इस्रायलसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाच्या युद्धनौका इराणमधील बंदर अब्बास येथे पोहोचल्या आहेत. भारत आणि इराणचे नौदल पर्शियन गल्फमध्ये संयुक्त सरावात भाग घेतील. अब्बास बंदरात भारतीय युद्धनौकांचे इराणी युद्धनौका जेराहने स्वागत केले. भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यातील तीन प्रशिक्षण युद्धनौका इराणला पाठवल्या आहेत.Israel

भारत आणि इराणचा भर सागरी सहकार्य वाढवण्यावर आहे. नौदलाचा ताफा इराणमधील बंदर अब्बास येथे पोहोचल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली. या ताफ्यात INS तीर, INS शार्दुल आणि ICGS वीरा यांचा समावेश आहे.



या वर्षी मार्चच्या सुरुवातीला इराणचे प्रशिक्षण जहाज बुशेहर आणि टोनाब मुंबईत पोहोचले होते. फेब्रुवारीमध्ये, इराणच्या नौदलाचे जहाज डेना या नौदल सराव मिलानमध्ये सहभागी झाले होते.

इस्रायलशी जवळीक आणि इराणबरोबरचे सराव याकडे भारताचे विवेकपूर्ण परराष्ट्र धोरण म्हणून पाहिले जात आहे. इराणच्या हल्ल्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवर चर्चाही केली होती. विशेष म्हणजे रशिया आणि युक्रेनप्रमाणे भारताचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. जगात असे फार कमी देश आहेत ज्यांचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. भारताने इराणच्या चाबहार बंदरातही मोठी गुंतवणूक केली आहे.

Indian warships reach Iran amid tensions with Israel

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात