वृत्तसंस्था
कोलकाता : राजकीय वैरभाव टोकाला गेलेल्या पश्चिम बंगालमधले एक वेगळे चित्र पाहायला मिळाले… दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातल्या भानगर मतदारसंघात. हाथीसाला सरोजिनी हाय मदरसा परिसरात… भाजपच्या उमेदवार सौमी हाथी आणि इंडियन सेक्युलर फ्रंटचे उमेदवार नौशाद सिद्दीकी समोरासमोर आलेIndian Secular Front chairman and candidate from Bhangar in South 24 Parganas district, Naushad Siddiqui and BJP candidate from the constituency, Soumi Hati greet each other
तेव्हा त्यांच्यात बंगाल स्टाइल वादावादी नाही झाली, तर दोघांनी एकमेकांना अभिवादन करून शुभेच्छा दिल्या. नौशाद सिद्दीकी गाडीत बसून अभिवादनाचा स्वीकार करीत आहेत आणि सौमी हाथी यांना शुभेच्छा देत आहेत, असा हा विडिओ आहे.
वास्तविक पाहता ही बातमी होतेय, याचाच अचंबा वाटला पाहिजे. कारण बंगालमधला राजकीय वैरभाव एवढा टोकाला गेला आहे, की असा एकही मतदारसंघ उरलेला नाही, की जिथून निवडणूक हिंसाचाराची, मारामारीची किंवा मतदान रोखल्याची बातमी आलेली नाही.
भाजपच्या नेत्यांच्या ताफ्यांवर, उमेदवारांवर हल्ले, गाड्यांवर दगडफेक याच्या शेकडो तक्रारी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. तृणमूळ काँग्रेसच्या गुंडाविरोधात काँग्रस आणि डाव्या पक्षांनीही तक्रारींचा सिलसिला लावला आहे.
#WATCH | Indian Secular Front chairman and candidate from Bhangar in South 24 Parganas district, Naushad Siddiqui and BJP candidate from the constituency, Soumi Hati greet each other. Visuals from near Hatisala Sarojini High Madrasah (H.S.) in the area.#WestBengalElections2021 pic.twitter.com/mlmU1GRRQE — ANI (@ANI) April 10, 2021
#WATCH | Indian Secular Front chairman and candidate from Bhangar in South 24 Parganas district, Naushad Siddiqui and BJP candidate from the constituency, Soumi Hati greet each other. Visuals from near Hatisala Sarojini High Madrasah (H.S.) in the area.#WestBengalElections2021 pic.twitter.com/mlmU1GRRQE
— ANI (@ANI) April 10, 2021
तर तृणमूळ काँग्रेसने भाजपने यूपी – बिहारमधून बंगालमध्ये गुंड आणून हिंसाचार माजविल्याचा आरोप केलाय. या सगळ्या प्रकारामुळे बंगालमध्ये राजकीय वैरभाव टोकाला गेल्याचे चित्र देशभर निर्माण झाले आहे.
वर उल्लेख केलेल्या पार्श्वभूमीवर दोन वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार योगायोगाने भेटतात आणि एकमेकांना अभिवादन करून सदिच्छा देतात, हे बंगालमध्ये दुर्मिळ चित्र दिसले आहे. याचा छोटा विडिओ एएनआय वृत्तसंस्थेने ट्विटरद्वारे शेअर केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App