वृत्तसंस्था
लंडन : काश्मीरमधील मानवाधिकारांच्या मुद्द्यावर ब्रिटनमधील सर्वपक्षीय संसदीय गटाने लोकप्रतिनिधीगृहात ठराव मांडत चर्चा केली. या ठरावावर भारताने जोरदार टीका केली आहे. Indian object Bristish discussion on Kasmir
काश्मी रबाबत कोणत्याही व्यासपीठावर चर्चा करायची असल्यास त्यात वास्तवाचे भान असणे आवश्यरक आहे, अशी प्रतिक्रिया भारताने दिली आहे. ‘काश्मीवरमधील परिस्थितीबाबत ब्रिटन सरकार कायमच गांभीर्याने विचार करत असले तरी अंतिमत: भारत आणि पाकिस्तान यांनीच यावर राजकीय तोडगा काढणे आवश्यतक आहे.
या प्रश्ना्वर चर्चा करताना एखादा उपाय सुचविणे किंवा मध्यस्थ म्हणून काम करणे, हा आमचा हेतू नाही,’ असे ब्रिटनच्या परराष्ट्र विभागातील आशिया विभागाच्या मंत्री अमांडा मायलिंग यांनी सांगितले. या ठरावावरील चर्चेवेळी काही सदस्यांनी वापरलेल्या भाषेवर भारताने आक्षेप नोंदविला.
विशेषत: नाझ शाह या मूळ पाकिस्तानी असलेल्या सदस्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काश्मीहर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याबद्दल आक्षेप घेतला. यावर भारताच्या उच्चायुक्तालयाने नाराजी व्यक्त केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App