भारतीय हवामान विभाग होतोय 150 वर्षांचा; आज ‘IMD’ला मिळणार नवीन लोगो

केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू नवीन लोगोचे अनावरण करणार आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वर्षानुवर्षे देशवासीयांना हवामानाच्या प्रत्येक बातम्या देत असलेले भारतीय हवामान विभाग (IMD) आता 150 वर्षांची होणार आहे. या निमित्त हवामान विभागाला नवा लोगो मिळणार आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू आज IMD च्या नवीन लोगोचे अनावरण करणार आहेत.Indian Meteorological Department turns 150 Today IMD will get a new logo



IMDची स्थापना 1875 मध्ये झाली आणि 2024-2025 मध्ये 150 वर्षे पूर्ण होतील. IMDने जानेवारी 2024पासून वर्षभर उत्सव साजरा करण्याची योजना देखील आखली आहे.

यादरम्यान, IMD विद्यार्थ्यांना हवामानशास्त्र आणि इन्व्हायरमेंटल सायन्समध्ये करिअरच्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित करेल. यासाठी अनेक कार्यक्रम, प्रदर्शने आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक चर्चासत्रे आणि संवाद सत्रे सुरू केली जातील.

Indian Meteorological Department turns 150 Today IMD will get a new logo

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात