विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून,जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. अनेक राज्यांनी शाळा सुरू करण्याचाही निर्णय घेतला असून, सरकारकडून विद्यार्थ्यांच्या नियमित ताप तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र, आयसीएमआरच्या संशोधनकांनी एका शोधनिबंधात ताप तपासणी टाळून शाळांमध्ये कोविड चाचण्या कराव्यात अशी शिफारस केली आहे. INDIAN JOURNAL OF MEDICAL: Fever should be avoided in schools, covid tests should be done; ICMR suggests
आयसीएमआरशी संबंधित असलेल्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या संशोधनात शाळांमध्ये कोविड चाचण्या करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दररोज ताप तपासणीतून कोविडच्या निदानाबद्दल मर्यादित पुरावे आहेत. त्यामुळे स्क्रीनिंग टाळावी, असं यात म्हटलं आहे.
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचं ओपन एक्सेस असलेलं प्रकाशन आहे. देशामध्ये हळूहळू शाळा सुरू केल्या जात असून, याच पार्श्वभूमीवर जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका शोधनिबंधात चुकीच्या धोरणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा संभाव्य धोका लक्षात घेता शाळांमध्ये स्क्रीनिंगऐवजी कोविड चाचण्या करण्याचं धोरण महत्त्वाचं ठरू शकतं. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गवा, समीरण पांडा आमि तनू आनंद यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. ‘शाळांमध्ये कोरोना चाचण्याचं धोरण एक साहाय्यभूत म्हणून स्वीकारलं गेलं पाहिजे’, असंही यात म्हटलं आहे.
‘शाळांमध्ये नियमित तापमान व अन्य लक्षणांची तपासणी करणं टाळलं पाहिजे. कारण त्यांच्या वापराबद्दलचे पुरावे खूप मर्यादित आहेत. देशातील सध्याच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे शाळांमध्ये चाचण्या करण्याची सुविधा असायला हवी, अशी शिफारस करत आहोत’, असं या संशोधनात म्हटलं आहे.
‘लहान मुलांच्या शाळा पुन्हा सुरू केल्यानंतर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नव्हती. तर माध्यमिक विद्यालये पुन्हा सुरू केल्यानंतर रुग्णसंख्या वाढल्याचं समोर आलं आहे. कारण विद्यार्थी कुटुंबातील लोकांनाही संसर्ग झालेला होता. दरम्यान, आयर्लंडमधील एका शाळेत पुन्हा संसर्ग झाल्याचं दिसून आलं आहे, असंही यात म्हटलेलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App