Indian Economy : मूडीजने वाढवला भारताच्या विकासदराचा अंदाज, चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 9.5 टक्के राहण्याची शक्यता

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाने प्रति बॅरल $100 ची पातळी ओलांडली आहे, ही भारतासाठी वाईट बातमी आहे. पण याच दरम्यान आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसकडून भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा विकास दर ९.५% राहण्याचा अंदाज मूडीजने व्यक्त केला आहे. यापूर्वी एजन्सीने तो 7 टक्के असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. Indian Economy: Moody’s raises India’s growth forecast, India’s GDP is expected to grow at 9.5 per cent in the current financial year


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाने प्रति बॅरल $100 ची पातळी ओलांडली आहे, ही भारतासाठी वाईट बातमी आहे. पण याच दरम्यान आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसकडून भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा विकास दर ९.५% राहण्याचा अंदाज मूडीजने व्यक्त केला आहे. यापूर्वी एजन्सीने तो 7 टक्के असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.



मूडीजने आपल्या ग्लोबल मेट्रो आउटलुक 2022-23 अहवालात म्हटले आहे की, कोरोना महामारी आणि दुसऱ्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे. मूडीजने २०२२ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ८.४ टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मूडीजचा अंदाज आरबीआयच्या अंदाजापेक्षा ६० बेसिस पॉइंट्सने जास्त आहे. 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे.

Moody’s Investors Service नुसार, भारतातील विक्रीकर संकलनात वाढ झाली आहे, किरकोळ व्यवहार उच्च आहे आणि PMI सुधारत आहे. मात्र, मूडीजने आपल्या ग्लोबल मेट्रो आउटलुक अहवालात म्हटले आहे की, इंधनाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा खंडित झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Indian Economy : Moody’s raises India’s growth forecast, India’s GDP is expected to grow at 9.5 per cent in the current financial year

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात