भारतीय तटरक्षक दलाने दमण जवळच्या समुद्रातून चिनी प्रवाशाचे वाचविले प्राण!!

वृत्तसंस्था

दमण : चिन्यांनी भारताशी शत्रुत्व करून भारतीय सैनिकांना लडाखमध्ये घुसखोरी करून मारले असले तरी भारत माणुसकी विसरलेला नाही याचे प्रत्यंतर भारतीय तटरक्षक दलाने केलेल्या कामगिरीवरून आले. भारतीय तटरक्षक दलाने एका चिनी प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी शर्थ करून त्यात यश मिळविले.Indian Coast Guard rescued Chinese passenger from sea near Daman!!



भारतीय तटरक्षक दलाने 16 ऑगस्ट रोजी अरबी समुद्रात सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या पनामा ध्वजांकित संशोधन जहाज एमव्ही डोंग फांग कान टॅन नंबर 2 मधून एका चिनी नागरिकाला बाहेर काढले. हे जहाज चीनहून यूएईला जात होते, जेव्हा रुग्णाने छातीत दुखणे आणि कार्डियाक अरेस्टची लक्षणे नोंदवली. हा संदेश भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना मिळाला होता त्यानंतर अंधारात CG ALH आणि CGAS दमणने ही कार्यवाही केली. या चिनी प्रवाशावर छोटी शस्त्रक्रियाही करावी लागली. ती शस्त्रक्रियाही डॉक्टरांनी यशस्वी पार पाडली.

कम्युनिस्ट चिन्यांनी कायमच भारताशी वैर केले. पण वैर असले, तर ते रणांगणावर, ही भारताची नेहमीच नीती राहिली. एरवी सर्वांशी माणुसकी धर्माने वागणे यावर भारतीयांनी नेहमीच भर दिला आहे. यातूनच दमण जवळच्या समुद्रात 200 किलोमीटर खोल अंतरावर जाऊन भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी जोखीम पत्करून चिनी प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत.

Indian Coast Guard rescued Chinese passenger from sea near Daman!!

महत्वाच्या बातम्या 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात