मोदींच्या GST Reforms भाषणाचे भारतीय व्यापार महासंघाकडून स्वागत; पण काँग्रेस + तृणमूल काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांची टीका

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : GST Reforms संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केलेल्या भाषणाचे अखिल भारतीय व्यापार महासंघाने स्वागत करून केंद्र सरकारने घोषित केलेल्या जीएसटी कपातीचा लाभ सर्व वर्गांना देण्याचे आश्वासन दिले. परंतु, काँग्रेस तृणमूल काँग्रेस यांच्यासकट सगळ्या विरोधकांनी मोदींच्या भाषणावर टीका केली.

नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण केले. उद्या सूर्योदयापासून जीएसटी कपात लागू होत असल्यामुळे 99 % वस्तू स्वस्त होतील. एक प्रकारे बचत महोत्सव सुरू होईल या बचत महोत्सवात गरीब मध्यमवर्ग नव मध्यमवर्ग यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

त्याचवेळी त्यांनी देशवासीयांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वदेशी घोषणेने प्रेरणा दिली तशीच प्रेरणा स्वातंत्र्याच्या 75 नंतर मिळाली पाहिजे आपण सगळ्यांनी स्वदेशी वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. गर्वसे कहो हम स्वदेशी खरीदते है असे म्हणाले पाहिजे, असे मोदी म्हणाले. अमेरिकन टेरिफचा त्यांनी भाषणात उल्लेख देखील केला नाही.

– व्यापार महासंघाकडून स्वागत

भारतीय व्यापार महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे स्वागत केले. महासंघाचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी देशातल्या जीएसटी सुधारणांचा लाभ सर्व वर्गांना देण्यासाठी व्यापारी वर्ग कटिबद्ध असल्याचे सांगितले.

काँग्रेस + तृणमूळ काँग्रेसचे टीका

पण काँग्रेस आणि तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींच्या भाषणावर टीका केली. मोदी मतं चोरी बद्दल काही बोलले नाहीत. जीएसटी सुधारणा हे ममता बॅनर्जी यांचे क्रेडिट आहे. ते मोदींनी स्वतःकडे ओढून घेतले, अशी टीका कुणाल घोष यांनी केली. जयराम रमेश यांनी सुद्धा मोदींच्या भाषणावर टीका केली. मोदी त्यांच्या अमेरिकन मित्राविषयी काही बोलले नाहीत. त्या अमेरिकन मित्राने भारताला सगळ्या बाजूने अडचणीत आणले, तरी त्याबद्दल मोदींनी अवाक्षर उच्चारले नाही, असा टोमणा जयराम रमेश यांनी मारला. आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी सुद्धा विरोधकांच्या सुरात सूर मिसळला.

Indian Chamber of Commerce welcomes Modi’s GST Reforms speech

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात