भारतीय हवाई दलाला मिळाला नवा गणवेश, नवी शाखा : ऑपरेश्नल ब्रँचमुळे फ्लाइंग ट्रेनिंगचा खर्च होणार कमी, सरकारचे 3400 कोटी वाचणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाला स्वातंत्र्यानंतर प्रथमच एक नवी ऑपरेश्नल ब्रँच मिळाली आहे. सरकारने त्याच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. हवाईदल प्रमुख व्ही आर चौधरी यांनी शनिवारी एअरफोर्स डे निमित्त आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली. ही ब्रँच अस्तित्वात आल्यानंतर सरकारच्या फ्लाइंग ट्रेनिंगच्या खर्चात कपात होऊन सुमारे 3400 कोटींच्या महसुलात बचत होईल.Indian Air Force got new uniform, new branch Due to operational branch, the cost of flying training will be reduced, the government will save 3400 crores

चंदीगड हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या 90 व्या वर्धापन दिनाचा सोहळा साजरा होत आहे. यावेळी एअरचीफ मार्शल यांच्या उपस्थितीत नवा गणवेष सादर करण्यात आला.



हवाईदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला एअरचीफ मार्शल व्ही आर चौधरी उपस्थित होते.

नव्या ब्रँचसह मिळाला कॉम्बॅट यूनिफॉर्म

एअरचीफ मार्शल यांनी सांगितले की, वेपन सिस्टम ब्रँच जमिनीवरून जमिनीवर व जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसह रिमोट पायलट एअरक्राफ्ट व ट्विन तथा मल्टी क्रू एअरक्राफ्टचे संचलन करेल. व्ही आर चौधरी यांनी यावेळी हवाई दलाच्या कॉम्बॅट यूनिफॉर्मचा एक नवा पॅटर्न लान्च करणार असल्याचीही माहिती दिली.

नव्या यूनिफॉर्मचे वैशिष्ट्य

भारतीय हवाई दलाचा नवा यूनिफॉर्म लष्कराच्या गणवेषासारखा आहे. त्याचा डिजिटल पॅटर्न सर्वच भागांसाठी अनुकूल आहे. हा गणवेष घालून सैनिकांना वाळवंट, डोंगराळ भाग, जंगलासारख्या सर्वच भागांत वेगाने हालचाल करता येईल. हा गणवेष नॅश्नल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीने (NIFT) डिझाइन केला आहे.

IAF च्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, IAF च्या नव्या यूनिफॉर्मचा रंग व शेड्स थोडे वेगळे आहेत. हा गणवेष हवाई दलात काम करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे.

Indian Air Force got new uniform, new branch Due to operational branch, the cost of flying training will be reduced, the government will save 3400 crores

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात