वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Hockey Asia Cup भारताने पुरुष हॉकी आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. रविवारी बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला. भारताने हे विजेतेपद चौथ्यांदा जिंकले. या विजयासह भारताने २०२६ च्या विश्वचषकातही स्थान मिळवले.Hockey Asia Cup
अंतिम सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला भारताकडून सुखजीत सिंगने गोल केला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंगने पुन्हा गोल केला आणि भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीतने आणखी एक गोल केला. चौथ्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. दक्षिण कोरियाकडून सन ड्युनने एकमेव गोल केला.Hockey Asia Cup
टीम इंडियाने अंतिम सामन्यात ५ वेळा विजेत्या दक्षिण कोरियाला हरवून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने २०१७ मध्ये अंतिम सामन्यात मलेशियाला हरवून आशिया कप जिंकला होता. कोरिया दुसऱ्यांदा उपविजेता ठरला. २००७ मध्ये अंतिम सामन्यातही संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App