2032 पर्यंत भारत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल – गौतम अदानी

India will become a 10 trillion Doller economy by 2032 Gautam Adani

भारताची खरी प्रगती अजून व्हायची आहे, असा दावा गौतम अदानी यांनी आपल्या भाषणात केला. India will become a 10 trillion Doller economy by 2032 Gautam Adani

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणतात की, आर्थिक वर्ष २०३२ पर्यंत भारत १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल आणि पायाभूत सुविधांवरील एकूण खर्च देखील २.५ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त होईल. क्रेडिट रेटिंग कंपनी CRISIL च्या वार्षिक इन्फ्रास्ट्रक्चर समिट ‘Infrastructure: The Catalyst for India’s Future’ मध्ये, गौतम अदानी यांनी पुढील आठ वर्षांत भारत 10 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या त्यांच्या अंदाजांचा उल्लेख केला.

अदानी म्हणाले, “आमच्या अंदाजानुसार भारत 2032 पर्यंत 10 ट्रिलियन यूएस डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट आहे – आणि त्यावेळी पायाभूत सुविधांवर होणारा एकूण खर्च 2.5 ट्रिलियन यूएस डॉलर असेल आणि या संपूर्ण खर्चाच्या सुमारे एक चतुर्थांश खर्च, म्हणजे 25 टक्के, ऊर्जा आणि ऊर्जा परिवर्तनावर अपेक्षित आहे…”

भारताची खरी प्रगती अजून व्हायची आहे, असा दावा गौतम अदानी यांनी आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, “प्रत्येक देशाची स्वतःची आव्हाने असली तरी, मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की भारताची खरी प्रगती, खरा विकास अजून व्हायचा आहे..

India will become a 10 trillion Doller economy by 2032 Gautam Adani

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात