वृत्तसंस्था
पाटणा : जम्मू-काश्मीरमध्ये ज्यापद्धतीने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तेथे गेलेल्या बाहेरच्या प्रदेशातील कामगारांची हत्या करत आहेत त्याचा निषेध म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी T 20 वर्ल्ड कप मधली भारत – पाकिस्तान मॅच भारतीय संघने खेळू नये. ती स्थगित करावी, अशी मागणी बिहारचे उपमुख्यमंत्री ताराकिशोर प्रसाद यांनी केली आहे.India vs Pak match in upcoming ICC T20 World Cup should be halted Pak get a message that if they keep supporting terrorism
आतापर्यंत पाकिस्तानशी संबंध ठेवताना कठोर भूमिका घेण्याची मागणी शिवसेनेने महाराष्ट्रातून लावून धरली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्याआधी खेळपट्टी खणण्यापर्यंत शिवसैनिकांची मजल गेली होती. परंतु, आता महाराष्ट्राऐवजी बिहार मधून पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे.
I think such things (India vs Pak match in upcoming ICC T20 World Cup) should be halted…so that Pak get a message that if they keep supporting terrorism, India will not stand by them on any matter: Bihar's Dy CM Tarkishore Prasad on recent targeted civilian killings in J&K pic.twitter.com/ZZejMBFA1y — ANI (@ANI) October 18, 2021
I think such things (India vs Pak match in upcoming ICC T20 World Cup) should be halted…so that Pak get a message that if they keep supporting terrorism, India will not stand by them on any matter: Bihar's Dy CM Tarkishore Prasad on recent targeted civilian killings in J&K pic.twitter.com/ZZejMBFA1y
— ANI (@ANI) October 18, 2021
बिहार मधल्या दोन कामगारांची दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या परिसरात गोळ्या घालून हत्या केली होती. याविषयी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून कठोर उपाययोजना करण्याची मागणी केलीच आहे.
या पार्श्वभूमीवर बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते ताराकिशोर प्रसाद यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना स्थगित करण्याची आग्रही मागणी केली आहे. पाकिस्तान बरोबर भारत कोणताही संपर्क प्रस्थापित करू इच्छित नाही, इशारा हा कठोर इशारा पाकिस्तानला भारताने आपल्या कृतीतून दिला पाहिजे, असे ते म्हणाले. पाकिस्तानला कोणत्याच प्रकारे आपल्याकडून पाठिंबा मिळता कामा नये अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App