Major Changes : भारत-अमेरिका व्यापार करारात बदल, यादीतून डाळ वगळली; भारतासाठी 500 अब्ज डॉलरची खरेदीही आवश्यक नाही

Major Changes

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Major Changes अमेरिकेने भारतासोबत झालेल्या अलीकडील व्यापार करारावर जारी केलेल्या आपल्या फॅक्ट शीटमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. आधी ज्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख होता, आता त्या एकतर काढून टाकण्यात आल्या आहेत किंवा त्यांची भाषा बदलण्यात आली आहे.Major Changes

गेल्या आठवड्यात दोन्ही देशांनी व्यापार कराराची घोषणा केली होती. यानंतर व्हाईट हाऊसने एक फॅक्ट शीट जारी करून पुढील रूपरेषा सांगितली होती. पण आता त्याच दस्तऐवजाची नवीन आवृत्ती जारी झाली आहे.Major Changes

सर्वात मोठा बदल डाळींबाबत आहे. आधी असे म्हटले होते की, भारत अमेरिकेच्या औद्योगिक आणि कृषी उत्पादनांवरील शुल्क कमी करेल किंवा रद्द करेल, ज्यात डाळींचाही समावेश होता. आता नवीन दस्तऐवजातून डाळींचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे.Major Changes



500 अब्ज डॉलरच्या खरेदीबाबतही भाषा बदलण्यात आली आहे. आधी असे लिहिले होते की, भारत, अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलरचा माल खरेदी करण्यासाठी ‘वचनबद्ध’ आहे. आता ते बदलून ‘इरादा आहे’ असे करण्यात आले आहे.

डिजिटल सेवा शुल्कावरही अमेरिकेच्या भूमिकेत नरमाई

नवीन दस्तऐवजात फक्त ऊर्जा, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, कोळसा आणि काही इतर वस्तूंचा उल्लेख आहे. डिजिटल सेवा शुल्कावरही अमेरिकेने नरमाई दाखवली आहे. आधी असे म्हटले होते की भारत हे शुल्क हटवेल. आता फक्त एवढेच लिहिले आहे की भारत डिजिटल व्यापाराच्या नियमांवर चर्चा करण्यास तयार आहे.

अमेरिकेने भारतावर रशियन तेल आयातीमुळे दंडाच्या स्वरूपात लावलेले २५% शुल्क परत घेण्याचाही निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे भारतीय व्यावसायिकांना ₹40 हजार कोटींचा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकृत माहितीनुसार, 27 ऑगस्ट 2025 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अमेरिकेने केलेल्या ज्या आयातीवर हा दंड (पेनल्टी) लावण्यात आला होता, त्याचा परतावा (रिफंड) दिला जाईल.

Major Changes in India-US Trade Deal; Pulses Removed from Fact Sheet

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात