अभिमानास्पद! महिला वैमानिकांच्या बाबतीत भारत जगात अव्वल; एअर इंडियामध्ये सर्वाधिक संख्या

Air India Woman pilot

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्व महिला कर्मचाऱ्यांसह ९० पेक्षा अधिक उड्डाणे सुरू आहेत.

विशेष प्रतिनिधी

एअर इंडियाने बुधवारी (8 मार्च 2023) सांगितले की त्यांच्या १ हजार ८२५ वैमानिकांपैकी १५ टक्के महिला वैमानिक आहेत. यासह एअर इंडिया सर्वाधिक महिला पायलट असलेली सर्वात मोठी विमान कंपनी बनली आहे. एवढेच नाही तर महिला वैमानिकांच्या बाबतीतही भारत अव्वल आहे. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरएशिया इंडिया आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सर्व महिला कर्मचाऱ्यांसह ९० पेक्षा अधिक उड्डाणे चालवत आहेत. India tops in women pilots Highest number in Air India

१ मार्चपासून संपूर्ण क्रूसह ९० उड्डाणे सुरू –

ही उड्डाणे १ मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर चालवली जात आहेत, असे एका निवेदनात म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “सर्व महिला कर्मचारी असलेल्या ९० विमानांपैकी एअर इंडिया देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर ४० उड्डाण चालवत आहे. तर दुसरीकडे एअर इंडिया एक्सप्रेस १० आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि एअरएशिया ४० पेक्षा जास्त देशांतर्गत उड्डाण संचलित करत आहे.


Indian Navy Helicopter : अरबी समुद्रात नौदलाच्या हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग’; तीन क्रू मेंबर्स थोडक्यात बचावले


एअर इंडियाच्या ४० टक्क्यांहून अधिक कर्मचारी महिला –

एअर इंडियाच्या ४० टक्क्यांहून अधिक कर्मचारी महिला आहेत, असे एअरलाइन्सने निवेदनात म्हटले आहे. एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, जगात सर्वाधिक व्यावसायिक महिला पायलट भारतात आहेत. ते म्हणाले, “एअर इंडियामध्ये आमच्यासोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवू शकतात हा संदेश दिल्याबद्दल आम्ही त्या प्रत्येकाचे आभार मानतो.” याशिवाय एअर इंडियाच्या एका निवेदना म्हटले आहे की, “अनेक महिला अर्थ, व्यावसायिक, मनुष्यबळ विकास, उड्डाण प्रशिक्षण, फ्लाइट डिस्पॅच, अभियांत्रिकी, सुरक्षा आणि ऑपरेशन्स नियंत्रण यासह विविध विभागांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

India tops in women pilots Highest number in Air India

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात