आर्थिक सर्वेक्षणात गेल्या 4 वर्षांमधले GDP चे सर्वाधिक आस्ते कदम, पण पायाभूत सुविधा क्षेत्रात वाढ कायम!!

Economic Survey

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2025 रोजी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी सटीक भाष्य करण्यात आले असून त्यामध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाची
(GDP) वाढ 2025 मध्ये सर्वांत आस्ते कदम राहणार असल्याचे सूचित केले आहे.

गेल्या चार वर्षांच्या तुलनेमध्ये 2025 मधली GDP आर्थिक वाढ सगळ्यात कमी म्हणजे 6.3 % ते 6.8 % राहण्याची शक्यता आहे पण त्याच वेळी रेल्वे, रस्ते, गृह बांधणी, एअरपोर्ट, पोर्ट या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वाढीला धक्का बसलेला नसून त्या पायाभूत सुविधांच्या वाढीचा दर कायम असल्याचे नमूद केले आहे.

2021 पासून 2024 पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षांमध्ये GDP वाढ 7.2 % ते 8.7 % एवढ्या मोठ्या प्रमाणावर राहिली होती. परंतु, 2024 मध्ये उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्रामध्ये आलेल्या अल्पमंदीने GDP ची वाढ रोखली. त्याचा परिणाम आकड्यांमध्ये दिसला. म्हणूनच 2025 मध्ये GDP वाढ 6.3 % ते 6.8 % आत मध्येच राहण्याची शक्यता आर्थिक सर्वेक्षणात वर्तवली आहे.

संबंधित आर्थिक सर्वेक्षण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडले पण त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद अधिवेशनापूर्वी माता लक्ष्मीची प्रार्थना करून तिची अखंड कृपा देशातल्या मध्यमवर्गीय आणि गरिबांवर राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यातून केंद्रीय बजेटमध्ये मध्यमवर्गीय आणि गरीब यांच्यासाठी विविध सुविधा वाढविण्याचे सूचित झाले. परंतु, आर्थिक सर्वेक्षणाने दिलेल्या आकडेवारीतून वास्तववादी चित्र काहीसे वेगळे ठरले.

देशाच्या महागाई दर 4.9 % वरून 4. 5 % पर्यंत कमी झाला. परंतु तो देखील समाधानकारक मानता येणार नाही. कारण सर्वसामान्यांच्या खिशाला लागलेली कात्री त्यामुळे कमी झालेली नाही. त्यामुळे महागाई रोखण्याचे आव्हान सरकारपुढे कायम आहे. ते सरकारने पेलले पाहिजे, असाही इशारा आर्थिक सर्वेक्षणाने दिला आहे.

India to grow by 6.3-6.8 percent in FY26 : Economic Survey

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात