केंद्रातले मोदी सरकार ज्यावेळी Make in India – Make for the World आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचे प्रमोशन करण्यात गुंतले आहे, त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला अनेकदा त्याच्या विपरीत सल्ला दिला. भारत उत्पादन क्षेत्रामध्ये नव्हे, तर सेवा क्षेत्रात आघाडीवर होता. तेच क्षेत्र आपण मजबूत केले पाहिजे. सेवाक्षेत्रा मध्येच जागतिक पातळीवर ठसा उमटवला पाहिजे. त्यातूनच भारताची आर्थिक प्रगती चांगली होऊ शकेल. आर्थिक प्रगतीचा वेग जगाच्या तुलनेत थोडा अधिक राहू शकेल, असा तो सल्ला होता आणि आहे.India should get the Chinese to do joint venture in manufacturing sector
थोडक्यात भारताने उत्पादन क्षेत्राकडे लक्ष देऊ नये. ते चिनी मक्तेदारीचे क्षेत्र आहे. चीनमध्ये ज्या पद्धतीने स्वस्त उत्पादन होते, तसे स्वस्त उत्पादन भारतात होऊ शकणार नाही. चीन बरोबर भारत स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे त्या क्षेत्राच्या नादी लागून भारताने नुकसान करून घेऊ नये, असा रघुराम राजन यांचा युक्तिवाद होता आणि आहे.
रघुराम राजन हे काँग्रेसी मनोवृत्तीचे अर्थतज्ञ आहेत, हे लपून राहिलेले नाही. त्यांनी भारत जोडो यात्रेत सामील होऊन राहुल गांधींची घेतलेली मुलाखत काँग्रेसने गाजवलेली होती, हे देखील लपून राहिले नाही. त्यामुळे रघुराम राजन यांनी राहुल गांधींसारखी उथळ भाषा वापरली नसली, तरी मोदी सरकारने प्रमोट केलेल्या आत्मनिर्भर भारत, Make in India – Make for the World या संकल्पनांना बौद्धिक छेद देण्याचा प्रयत्न केला हे विसरून चालणार नाही. पण रघुराम राजन यांनी केलेल्या या बुद्धीभेदाला आत्तापर्यंत फारसे कुणी उत्तर देताना आढळत नव्हते. ते उत्तर आता नीती आयोगाचे माजी अध्यक्ष अमिताभ कांत यांनी वेगळ्या पद्धतीने दिले.
चीन बरोबर उत्पादन क्षेत्रात उतरा
अमिताभ कांत यांनी Make in India – Make for the World आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांची रघुराम राजन यांच्यासारखी बिलकुल खिल्ली उडवली नाही. त्याउलट या संकल्पनांना अधिक अर्थवाही करण्यासाठी आणखी पुढे जाण्याचा सल्ला दिला. त्यात त्यांनी भारत आणि चीन या दोन राजकीय आणि सामरिक शत्रूंना आर्थिक हितसंबंधांच्या पातळीवर एकत्र येण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांनी जपान आणि तैवान या दोन देशांची उदाहरणे दिली. चीन आणि जपान त्याचबरोबर चीन आणि तैवान यांच्यात राजकीय आणि सामरिक वैर सर्वश्रुत आहे, तरी देखील चीन आणि जपान यांच्यातला व्यापार आणि आर्थिक हितसंबंध उंचावलेलेच आहेत. त्याचबरोबर एकीकडे चीन तैवानला गिळंकृत करू पाहत असताना चीनमध्ये होणारी सर्वाधिक गुंतवणूक तैवानी उद्योगपतींची आहे, याकडे अमिताभ कांत यांनी लक्ष वेधले.
#WATCH | Delhi | Former NITI Aayog CEO Amitabh Kant says, "…Instead of importing from China, we should get the Chinese to do joint ventures with Indian companies on a minority stake and do manufacturing in India and that will enable India to do both input manufacturing and… pic.twitter.com/Tn0dVkeVE1 — ANI (@ANI) August 14, 2025
#WATCH | Delhi | Former NITI Aayog CEO Amitabh Kant says, "…Instead of importing from China, we should get the Chinese to do joint ventures with Indian companies on a minority stake and do manufacturing in India and that will enable India to do both input manufacturing and… pic.twitter.com/Tn0dVkeVE1
— ANI (@ANI) August 14, 2025
त्याच पद्धतीने भारताने चीनबरोबरचे राजकीय आणि सामरिक संबंध कितीही ताणले गेले असले, तरी चीनकडून 120 अब्ज रुपयांची आयात करण्यापेक्षा चीनबरोबर उत्पादन क्षेत्रामध्ये संयुक्त प्रकल्प घेऊन उतरावे. त्यामध्ये सुरुवातीला भारताचा stake कमी असला तरी चालेल, पण भारताने उत्पादन क्षेत्रात चीनबरोबर उतरण्याचा आग्रह धरावा. चिनी कंपन्यांबरोबर सहयोग करून भारतात उत्पादन क्षेत्र वाढवावे. जपान आणि तैवान यांच्यासारख्या चीनच्या राजकीय वैऱ्यांना जे जमू शकते, ते भारतालाही जमू शकेल. त्यामुळे भारताने उत्पादन क्षेत्रामध्ये चीनच्या बरोबर उतरावे, असा स्पष्ट सल्ला अमिताभ कांत यांनी दिला. हा सल्ला खऱ्या अर्थाने रघुराम राजन यांनी केलेल्या बुद्धीभेदाला प्रत्युत्तर देणारा उतारा ठरलाय.
मार्ग खडतर
अर्थात चीन बरोबर उत्पादन क्षेत्रात सहयोगी होण्याचा सल्ला देणे सोपे, पण त्याची अंमलबजावणी कठीण अशी स्थिती आहे. हे समजावून घ्यायला फार मोठ्या तज्ज्ञाची गरज नाही. कारण चीन बरोबरचे कोणतेही साधे deal देखील अवघडच असते. चीन सहजासहजी उत्पादन क्षेत्रातील आपली मक्तेदारी सोडणार नाही भारताला आपला स्पर्धक बनवून देणार नाही, याची भारतीय धोरणकर्त्यांना निश्चित जाणीव आहे. खुद्द अमिताभ कांत हे त्यातलेच एक एक धोरणकर्ते आहेत. पण निदान भारताने आयाती वरचा आपला भर कमी करून उत्पादनावरचा भर वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले पाहिजे. ते कितीही जड असले तरी पुढे टाकले पाहिजे, हा विचार त्यांनी मांडलाय. याचा अर्थच मोदी सरकार तसा विचार करू शकते सुरुवातीला अडथळे जरूर येतील पण भारताने पाऊल मागे घेतले नाही, ते अडथळे सुद्धा दूर होऊ शकतील.
गुणवत्ता पूर्ण उत्पादन
उत्पादनांची गुणवत्ता या निकषावर भारत टप्प्याटप्प्याने का होईना, पण चीनवर मात करू शकेल. कारण भारताकडे असणारा skill set चीन पेक्षा संख्येने कमी असला, तरी तो अधिक गुणवत्ता पूर्ण आणि अचूक आहे. bulk आणि दुय्यम दर्जाच्या उत्पादनांपेक्षा गुणवत्तापूर्ण आणि customise उत्पादने भारत चीन पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल. तेवढे कौशल्य भारताने आत्मसात केले आहे. चीनशी स्पर्धा करताना भारताचा हा plus point आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App