वृत्तसंस्था
अबुधाबी : भारतीय क्रिकेट संघातील जोरदार सलामीवीर के. एल. राहुलने भारतीय संघाचा मेंटॉर महेंद्रसिंग धोनी याची तोंडभरून स्तुती केली आहे. राहुलने म्हटले आहे की धोनी अजूनही स्फोटक फलंदाज आहे. संघातल्या तरुण आणि ताकदवान फलंदाजांपेक्षाही धोनी अजूनही सर्वात लांबवर चेंडू फटकावू शकतो. India opener KL Rahul feels the legendary MS Dhoni, can hit the farthest sixes beating some of the muscular youngsters.
धोनीने नुकताच चेन्नई सुपर किंग्जला चौध्यांदा आयपीएलचा किताब जिंकून दिला. यामुळे सन 2022 च्या आयपीएलमध्येही तो पुन्हा खेळण्याची शक्यता वाढली आहे. तत्पुर्वी सध्या तो भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून लवकरच सुरु होणाऱ्या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघासोबत आहे. धोनीची उपस्थिती भारतीय खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल असे सांगितले जात आहे.
राहुल म्हणाला की, आमच्यातल्या कोणालाच असे वाटत नाही की आयपीएल 2021 ची फायनल हा धोनीचा शेवटचा सामना आहे. धोनी आमच्यातल्या कोणत्याही फलंदाजाला अजूनही खूप जोरदार टक्कर देऊ शकतो. आमच्यापेक्षा लांब चेंडू फटकावू शकता. तो खूप मजबूत आहे. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये तो अजूनही तितकाच चपळ आहे. त्याची तंदुरुस्ती जबरदस्त आहे. त्याचे आमच्यासोबत असणे खूप उपयुक्त आहे.
येत्या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत भारताचा डाव सुरु करण्यासाठी मी पूर्ण तयार झालो आहे, असे राहुलने सांगितले. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या रविवारी पाकिस्तान विरोधात होणार आहे. राहुलच्या मते धोनीपेक्षा आणखी चांगला मेंटॉर आण्हाला मिळू शकला नसता. धोनी पुन्हा आमच्या टीमसोबत आल्याचा खूप आनंद आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही खेळलो आहोत. तो आमचा कँप्टन असतानाही आम्ही त्याच्याकडे आमचा मेंटॉर म्हणूनच पाहात होतो.
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राहुलने इंग्लडविरुद्धच्या पहिल्या वॉर्म-अप सामन्यात जोरदार अर्धशतक फटकावले होते. राहुलच्या मते धोनीच्या ड्रेसिंग रुममधल्या उपस्थितीमुळे संघात शांतता नांदेल. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी त्याचा आम्हा सगळ्यांना उपयोग होईल. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मी त्याच्या सोबत आहे. क्रिकेटसंदर्भात त्याचे डोके खायला मला आवडेल, असे राहुल म्हणाला.
के. एल. राहुल हा टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये सातत्य राखणारा फलंदाज आहे. गेल्या चार आयपीएलमध्ये त्याने अनुक्रमे 659, 593, 670, 626 अशा धावांची रास उभी केली आहे. त्याच्या मते आयपीएल मधल्या सातत्याचा उपयोग त्याला वर्ल्ड कपमध्ये होणार आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या आपीएलचा दुसरा भाग ज्या आखाती देशांमध्ये खेळला गेला त्याच देशांमध्ये वर्ल्ड कपही खेळला जाणार आहे. राहुलच्या मते येथील वातावरणाशी आणि खेळपट्टयांशी जुळवून घेतल्याचा फायदा होईल. कोणते फटके मारायचे, कोणते मारायचे नाहीत याचा इथल्या मैदानांवरचा अंदाज आलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App