भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा पाहिजेतच, अन्यथा लोकशाही धोक्यात!!

  • केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा पुन्हा गंभीर इशारा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा पाहिजेतच अन्यथा लोकसंख्येचे असंतुलन संपूर्ण देशाची लोकशाही व्यवस्थाच धोक्यात आणेल, असा इशारा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी दिला आहे. India needs Population Control Act and Uniform Civil Code

यासाठी त्यांनी काही तर्क दिले आहेत. भारतात ज्या राज्यांमध्ये बहुसंख्यांक म्हणजे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली, तिथे लोकशाही व्यवस्था धोक्यात आली. बांगलादेश आणि पाकिस्तान ही त्याची उदाहरणे आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारतात आजही लोकसंख्या संतुलनाची समस्या आहेच. काश्मीर, केरळ पूर्वांचल मधील काही राज्ये आणि बंगाल इथल्या लोकसंख्येचे प्रमाण पाहिले, तर लोकसंख्येतील असंतुलन धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे लक्षात येते आणि त्याचाच दुष्परिणाम भारताच्या ऐक्यावर, अखंडतेवर आणि लोकशाहीवर होण्याची दाट शक्यता आहे.

म्हणूनच देशात लवकरात लवकर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा संसदेत मंजूर करून घेऊन त्याची ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे, तरच देशातली सामाजिक समता, समरसता आणि देशाची अखंडता टिकून राहील अन्यथा देशापुढीर काही कठीण समस्या अधिक उग्र रूप धारण करतील, असा गंभीर इशारा गिरीराज सिंह यांनी दिला आहे.

India needs Population Control Act and Uniform Civil Code

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात