Pakistan “पाकिस्तानला रावणासारखा धडा शिकवावा लागेल, की अन्य मार्गाने त्याला संपवावा लागेल??

भारताने operation sindoor चा पहिला भाग यशस्वी केल्यानंतर पुढच्या टप्प्यात भारत कोणती आक्रमक पावले टाकून पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल??, याविषयी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे मंथन सुरू आहे. त्यातूनच पाकिस्तानचे 4 तुकडे पडतील. बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा, सिंध आणि पंजाब एकमेकांपासून स्वतंत्र होतील आणि पाकिस्तानचे राजकीय अस्तित्व मिटून जाईल, अशा मंथनाचा एक मोठा भाग भारतामध्ये सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याचे पडसाद उमटतच आहेत. Pakistan

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसैनिकांनी तर भारताकडे उघड मदतीची मागणी करून भारताने ती विशिष्ट मदत केली, तर बलुचिस्तान पाकिस्तान पासून काही दिवसांमध्येच वेगळा काढू, असा निर्धार व्यक्त केला आहे. भारताने अजून अधिकृतरित्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य युद्धाला पाठिंबा दिलेला नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016 च्या लाल किल्ल्यावरच्या भाषणात त्याचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य युद्धाला मोठे पाठबळ मिळाले होते ही वस्तुस्थिती नाकाराचे कारण नाही. त्याचबरोबर खैबर आणि सिंध या प्रांतांमध्ये स्वातंत्र्य युद्धाचे मोठे पडसाद उमटले आणि तिथल्या स्वातंत्र्यसैनिकांना मोठे बळ मिळाले ही देखील वस्तुस्थिती नजरेआड करायचे कारण नाही. Pakistan

पण या सगळ्या गोष्टी घडत असतानाही पाकिस्तान नावाची प्रवृत्ती संपेल किंवा पाकिस्तान नावाचा देश जगाच्या नकाशावरून नाहीसा होईल, पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल. पाकिस्तानचा दहशतवाद संपेल. पाकिस्तानी लष्कराचे कंबरडे कायमचे मोडेल, असे सहज सोपे समजणे हे खरंच राजकीय आणि सैनिकीदृष्ट्या स्वप्न रंजनच ठरेल आणि या स्वप्नरंजनापासून सुज्ञ भारतीयांनी आणि भारतीय राज्यकर्त्यांनी दूर राहणेच इष्ट ठरेल. कारण स्वप्नरंजन, राजकीय सत्य आणि लष्करी वास्तव यात फार मोठे अंतर असते.



कारण पाकिस्तान नावाची संकल्पना ज्या इस्लामी तत्त्वांमधून अस्तित्वात आणली गेली, तिच्यामध्ये सुरुवातीला राष्ट्र – राज्य त्या संकल्पना अनुस्यूत होत्या, पण नंतर पाकिस्तानच्या इस्लामीकरणात त्या हळूहळू अस्तंगत होत गेल्या आणि उरली ती फक्त इस्लामी राष्ट्राची पाकिस्तानी संकल्पना.

या “पाकिस्तानी” संकल्पनेत आणि “भारतीय” संकल्पनेत मूलभूत अंतर राहिले. भारताने राष्ट्र – राज्य (Nation state) संकल्पनेनुसार स्वतःची लोकशाही आपल्या पद्धतीने विकसित केली. तिची वेगवेगळी रूपे आपल्या राज्यपद्धतीत अस्तित्वात आणून रुजवली. त्या उलट पाकिस्तानने इस्लामी राष्ट्राची संकल्पना राज्यव्यवस्थेत आणि जनमानसात खोलवर रुजवली. या इस्लामी राज्याच्या संकल्पनेत दोनच उपसंकल्पना आहेत त्या म्हणजे “दार उल हरब” आणि “दार उल इस्लाम”. याचा अर्थ इस्लामचे राज्य आणि इस्लाम नसलेले राज्य. जोपर्यंत इस्लाम नसलेले राज्य इस्लामी राज्यात विलीन होत नाही किंवा ते कोणत्याही मार्गाने इस्लाम स्वीकारत नाही, तोपर्यंत संपूर्ण इस्लामी राज्याची संकल्पना अस्तित्वातच येत नाही. ती संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी अखंड युद्ध लढायचे असते, असे इस्लाम मानतो. पाकिस्तान याच इस्लामी तत्त्वांनुसार चालतो. यात कुठेही राष्ट्र राज्य (Nationa State)
नावाची संकल्पनाच अस्तित्वात नाही.

त्यामुळे kuranic concept of war म्हणजेच जिहादी युद्ध पद्धतीनुसार त्याने भारताविरुद्ध युद्ध पुकारले आहे. यामध्ये कुठेही पाकिस्तान सध्या आहे त्यानुसार, किंवा आहे त्या स्वरूपात अस्तित्वात राहील, की ते फुटेल किंवा विस्तारेल, याचा काहीही संबंध नाही. कारण kuranic concept of war आणि भारतीय युद्ध पद्धती यातही मूलभूत अंतर आहे. भारतीय युद्ध पद्धती “मरणान्ति वैराणी” हे तत्व शिकवते. त्यामुळे युद्धात शत्रू पराभूत झाला की त्याला क्षमा करायची सद्गुण विकृती भारतीयांमध्ये विकसित झाली, पण kuranic concept of war मध्ये “मरणान्ति वैराणी” ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. शत्रूला आपला धर्म स्वीकारायला लावा आणि स्वीकारला नाही, तर त्याला कोणत्याही नैतिक अथवा अनैतिक मार्गाने मारून टाका हीच kuranic concept of war
आहे. त्यामुळे पाकिस्तान आत्ता आहे तसे अस्तित्वात राहील की नाही यावर पाकिस्तानी युद्धनीती अवलंबून नाही. जोपर्यंत ते भारताचा पूर्ण पराभव करणार नाहीत आणि भारताला इस्लामिक राष्ट्रात रूपांतरित करणार नाहीत, तोपर्यंत ते काहीही झाले तरी लढाई थांबवणार नाहीत.

त्यामुळे पाकिस्तानचे 4 तुकडे पडले, बलुचिस्तान, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तुनवा हे प्रांत वेगळे झाले म्हणून “पाकिस्तान” नावाची संकल्पना अस्तंगत होईल आणि दहशतवाद संपेल, असे मानणे हे स्वप्न रंजनच ठरेल. पाकिस्तान तुटून बांगलादेशाची निर्मिती झाली, तरी पाकिस्तानने दहशतवाद संपविला नाही हे त्याचे उदाहरण लक्षात घ्यावे लागेल. त्या उलट दहशतवादाविरुद्ध कायमचा लढा उभा करण्याची यंत्रणा निर्माण करणे, ते युद्ध दीर्घकाळ चालेल हे गृहीत धरून त्यानुसार रणनीती आखणे भारतासाठी हितावह ठरणार आहे.

– रक्तबीज राक्षस आणि पाकिस्तान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी “पाकिस्तान” नावाच्या जिहादी प्रवृत्तीची तुलना रावणाशी केली होती. रामाने जसा रावणाला धडा शिकवला, तसा भारताने पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, असे ते म्हणाले होते. पण पाकिस्तानचे एकूण स्वरूप आणि kuranic concept of war लक्षात घेता, ती तुलना काहीशी अनाठायी आणि अयोग्य होती. पण भारतीय पुराणाचा दाखला घेऊनच जर पाकिस्तानची कुणाशी तुलना करायची असेल, तर ती रक्तबीज नावाच्या राक्षसाशी होऊ शकेल. कारण रक्तबीज नावाचा राक्षस मारला गेला, तरी त्याच्या रक्तातून नवा राक्षस तयार व्हायचा आणि तो निरंतर युद्ध करत राहायचा‌‌. त्यामुळे महादेवी बनशंकरीने त्याच्याशी युद्ध करून त्याचे बीजच कायमचे नष्ट केले होते. भारताला नेमकी हीच भूमिका स्वीकारून पाकिस्तानशी “सर्व प्रकारचा व्यवहार” करावा लागेल. “पाकिस्तान” नावाचे “बीज” जिथे जिथे आणि ज्या ज्या स्वरूपात अस्तित्वात आहे, ते “बीज” नष्ट करावे लागेल.‌तरच Kuranic concept of war या संकल्पनेवर कायमचा प्रहार होऊ शकेल. तेव्हाच “पाकिस्तान” नावाची संकल्पना संपुष्टात येईल. तिथे केवळ भारतीय संकल्पनेनुसार “मरणान्ति वैराणी” हे तत्त्व अवलंबून शांतिपाठ करून चालणार नाही.

India must destroy Pakistan like Raktbeej demon rather than Ravan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात