चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ध्वज फडकवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. असंही म्हणाल्या
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताच्या कामगिरीचा उल्लेख केला. आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, गेले वर्ष भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीने भरलेले राहिली. या काळात देशवासियांना अभिमान वाटावा असे अनेक क्षण आले; जगातील गंभीर संकटांच्या काळात भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला; भारताचा विकास दर सलग दोन तिमाहीत ७.५ टक्क्यांच्या वर आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ध्वज फडकवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.India has become the fastest growing economy President Murmu
तसेच भारताने आदित्य मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले, पृथ्वीपासून 15 लाख किमी दूर आपला उपग्रह पाठवला. ऐतिहासिक G-20 शिखर परिषदेच्या यशामुळे संपूर्ण जगात भारताची भूमिका मजबूत झाली. प्रथमच, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 हून अधिक पदके जिंकली आणि पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतही शंभरहून अधिक पदके जिंकली. भारताला सर्वात मोठा सागरी सेतू अटल सेतू मिळाला. असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले आणि भारताला पहिली नमो भारत ट्रेन आणि पहिली अमृत भारत ट्रेन मिळाल्याचेही त्यांनी सांगितेल
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात कोरोना महामारी आणि युद्धाचा उल्लेख केला. राष्ट्रपती म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत जगाने दोन मोठी युद्धे पाहिली आहेत आणि कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना केला आहे. एवढे जागतिक संकट असतानाही माझ्या सरकारने देशातील महागाई नियंत्रणात ठेवली आणि सर्वसामान्य भारतीयांवर बोजा वाढू दिला नाही. 2014 पूर्वीच्या दहा वर्षांत सरासरी महागाई दर ८ टक्क्यांहून अधिक होता. गेल्या दशकात सरासरी महागाई दर ५-१० टक्के होता. सर्वसामान्य देशवासीयांच्या खिशात जास्तीत जास्त बचत व्हावी यासाठी माझ्या सरकारचा प्रयत्न आहे. पूर्वी भारतात २ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर आकारला जात होता, आज भारतात ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App