India – EU FTA : सगळ्या जगावर दादागिरी करता करता ट्रम्पने अमेरिकेलाच एकटे पाडले!!

नाशिक : सगळ्या जगावर दादागिरी करता करता ट्रम्पने अमेरिकेलाच एकटे पाडले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार झाला आणि संरक्षण करार झाला, त्याच्या परिणामातून हे घडून आले.

भारत आणि युरोपियन युनियन मधले 27 देश म्हणजेच जगातले 1.2 दोन अब्ज लोक आणि जगातली 25 % अर्थव्यवस्था या मुक्त व्यापार कराराच्या निमित्ताने एकत्रित झाली. या करारातून भारत आणि युरोपीयन युनियन मधले 27 देश एकमेकांशी मुक्त व्यापार करायला मोकळे झालेच, पण त्याचबरोबर दोन्ही घटकांचे जागतिक राजकारणातले आणि जागतिक व्यापारातले स्थान मोठ्या प्रमाणावर उंचावले. त्यामुळे जागतिक राजकारणात चालणारी अमेरिकेची दादागिरी आणि जागतिक उत्पादन क्षेत्रात चालणारी चीनची दादागिरी यांना वेसण घालण्याला सुरुवात झाली.

– भारत आणि युरोपियन युनियन यांची गरज

ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्म मध्ये भारतासह सगळ्या देशांवर टेरिफ बॉम्ब फेकले. त्यामुळे भारताला अमेरिकेशी तोडीस तोड असा व्यापार पार्टनर शोधायचा होता, तो युरोपियन युनियनच्या निमित्ताने मिळाला, तर युरोपियन युनियन मधल्या 27 देशांना चिनी उत्पादनांवरचे आपले अवलंबित्व कमी करायचे होते. त्यांना जागतिक पातळीवरचा पर्यायी उत्पादक देश हवा होता, तो भारताच्या रूपाने त्यांना मिळाला.

– तिसरी तोडीस तोड शक्ती

जागतिक राजकारणात दादागिरी करून अमेरिकेने अद्वितीय स्थान मिळवले होते, तर जागतिक उत्पादनात दादागिरी करून चीनने अद्वितीय स्थान मिळवले होते, जगातले कुठलेच देश या दोन्ही महाशक्तींच्या तोडीस तोड नाहीत, असे भासविले जात होते, प्रत्यक्षात भारत आणि युरोपियन युनियन यांनी मुक्त व्यापार करा आणि मुक्त संरक्षण करार करून जागतिक व्यापारात आणि जागतिक राजकारणात तिसरी तोडीस तोड शक्ती उभी राहिल्याची ठळक जाणीव करून दिली.

– ट्रम्पने केलेले मुक्त व्यापार करार अडचणीत

एकीकडे भारत आणि युरोपियन युनियन मधले 27 देश एकत्र आले असताना दुसरीकडे ट्रम्प यांनी युरोपियन युनियन बरोबर केलेला अमेरिकेचा मुक्त व्यापार करार आणि ब्रिटन बरोबर केलेला अमेरिकेचा मुक्त व्यापार करार हे दोन्ही करार अडचणीत आले. कारण युरोपियन युनियनच्या पार्लमेंटने अमेरिकेशी झालेल्या करारावर शिक्कामोर्तब करायला नकार दिला. त्याचवेळी ट्रम्प यांनी दक्षिण कोरियावर 25 % जादा टेरिफचा बॉम्ब फेकला, त्यामुळे त्या देशाने सुद्धा अमेरिकेशी झालेला मुक्त व्यापार करार थंड्या बस्त्यात टाकला.

– उथळ राजकारणाला दणका

ट्रम्प यांनी व्हेनेजुएलाच्या अध्यक्षांना अटक करून पुढचे पाऊल ग्रीनलँडच्या दिशेने टाकले. कॅनडाला ही गिळंकृत करण्याची उथळ भाषा वापरली. त्यामुळे सगळे जागतिक राजकारण ढवळून निघाले. ट्रम्प सगळ्या जगावर अमेरिकेची दादागिरी लादायला गेले. त्यांना त्यांनीच वापरलेल्या कुठल्याही उथळ भाषेत कुठल्याही देशाच्या प्रमुखांनी प्रत्युत्तर दिले नाही, पण कृतीतून प्रत्युत्तर द्यायला कुणीही मागेपुढे पाहिले नाही. भारत आणि युरोपियन युनियन यांनी तर अत्यंत वेगाने वाटाघाटी करून मुक्त व्यापार करार आणि मुक्त संरक्षण करार करून ट्रम्प यांना कृतीतून सणसणीत चपराक हाणली. ही चपराक हाणताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांनी ट्रम्प यांचे किंवा अमेरिकेचे नाव सुद्धा घेतले नाही.

india-eu-fta-Today is a day that will be remembered forever, marked indelibly in our shared history.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात