वृत्तसंस्था
नवी दिल्ली :India Economy भारताकडे युवा लोकसंख्या, डिजिटल सामर्थ्य, मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम, उत्पादन आणि हरित ऊर्जेची ताकद आहे. या बळावर देशाची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत म्हणजेच पुढील 21 वर्षांत 26 ट्रिलियन डॉलर (2,314 लाख कोटी रुपये) होऊ शकते, जी सध्या सुमारे 4.18 ट्रिलियन डॉलर (376 लाख कोटी रुपये) आहे.India Economy
रेटिंग एजन्सी अर्न्स्ट अँड यंग (EY) च्या अहवालात या गोष्टी नमूद केल्या आहेत. अहवालानुसार, या विकासामुळे भारतात प्रति व्यक्ती उत्पन्न देखील 2.5 लाख रुपयांवरून वाढून 13.5 लाख रुपये होईल. EY चे मत आहे की भारत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.India Economy
या महत्त्वाच्या घटकांमुळे आशा वाढली
मोठी कार्यरत लोकसंख्या :
2030 पर्यंत, भारताची 68.9% लोकसंख्या कार्यरत वयोगटातील (15-64 वर्षे) असेल. तेव्हा देशात 1.04 अब्ज म्हणजेच सुमारे 100 कोटी लोक कार्यरत असतील. पुढील दशकात जगात सामील होणारे 24-25% नवीन कामगार येथूनच असतील. सरासरी वय 28.4 वर्षे आहे.
मजबूत स्टार्टअप प्रणाली :
भारतात 107 युनिकॉर्न आहेत. 4 वर्षांत ते वार्षिक 66% नी वाढले. त्यांचे एकूण मूल्य 7.37 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. गुंतवणूकदारांनी सुमारे 3.82 लाख कोटी रुपये नफा कमावला. भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये पुढेही चांगल्या संधी आहेत.
उत्पादन क्षेत्रात संधी :
पीएलआय योजनेअंतर्गत 14 क्षेत्रांमध्ये ₹2.5 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव मिळाले. यामुळे उत्पादन क्षेत्रात सध्या कृषी क्षेत्रात असलेल्या 43% लोकांना नवीन रोजगार मिळू शकतात. यामुळे पायाभूत सुविधांमध्येही गुंतवणूक वाढेल.
कार्यरत महिलांची संख्याही वाढेल:
भारताच्या उच्च शिक्षणामध्ये सुमारे 49% विद्यार्थिनी आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, येत्या काही वर्षांत भारताच्या कार्यबलात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत देशासाठी उत्पादकता वाढवण्याच्या मोठ्या संधी दिसत आहेत.
डिजिटल पेमेंटमध्ये वाढ:
यूपीआय नेटवर्कशी 350 हून अधिक बँका जोडलेल्या आहेत. याचे 26 कोटींहून अधिक युनिक युझर्स आहेत. भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2014-2019 दरम्यान 15.6% दराने वाढली, जी देशाच्या एकूण आर्थिक वाढीपेक्षा 2.4 पट वेगवान होती.
अधिक कर्जाची शक्यता:
जागतिक बँकेनुसार, 2020 मध्ये भारतात खाजगी कंपन्या आणि व्यवसायांना दिलेले एकूण कर्ज, देशाच्या जीडीपीच्या केवळ 55% होते. हे जगाच्या सरासरी 148% पेक्षा खूप कमी आहे. याचा अर्थ असा की कंपन्या अजूनही कर्ज घेण्यास सक्षम आहेत.
स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकास:
2070 पर्यंत भारताने नेट झिरोचे लक्ष्य निश्चित केले आहे. याचा अर्थ असा की यानंतर भारत पेट्रोल-डिझेलसारख्या जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व संपवेल. ही एक मोठी संधी आहे.
या उद्दिष्टासाठी, सरकारला 2030 पर्यंत जीडीपीच्या तुलनेत कार्बनच्या सध्याच्या वापरात 45% कपात करावी लागेल. सरकार ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासावर भर देत आहे. केवळ ईव्ही इकोसिस्टमसाठी केंद्राकडून 14.5 अब्ज डॉलरचा पाठिंबा आहे. 2030 पर्यंत एकूण 10 कोटी लोक ईव्हीमध्ये स्थलांतरित होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App