भारताची BRICS देशांना संपूर्ण व्यापार कृपया चलनात करायची मुभा; अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला दिला धक्का!!

Dollar and india

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोजच्या बडबडीच्या दमबाजीला भारताने ठोस कृतीतून प्रत्युत्तर दिले. भारताने ब्रिक्स समूहातल्या देशांना रुपया आपला संपूर्ण व्यापार करायची मुभा दिली. त्यातून भारताने आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकेच्या डॉलरच्या वर्चस्वाला धक्का दिला.India Ditches USD, Sends Circular To BRICS Granting Full Rupee Access

डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन – रशिया युद्धाच्या निमित्ताने भारताला सतत दमबाजी चालवली आहे ते रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन भारत आणि पाकिस्तान यांच्यातले युद्ध थांबवण्याचे श्रेय घेत आहेत त्याचवेळी “ब्रिक्स” देशांना जास्त टेरिफ लावण्याच्या धमक्या देत आहेत. त्यातही त्यांचा कटाक्ष भारतावर जास्त आहे. कारण ते चीनला दमात घेऊ शकत नाहीत.



डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोजच्या बडबडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच्या रोज प्रत्युत्तर देत बसले नाहीत. त्या उलट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर वेळोवेळी ट्रम्प यांना प्रत्युत्तरे दिली. पण भारताने आता त्याच्या पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला धक्का देणारी कृती केली. भारताने “ब्रिक्स” समूहातल्या देशांना आपला सर्व व्यापार रुपया या चलनात करायची मुभा दिली. रिझर्व बँक ऑफ इंडियाने भारतीय व्यापाऱ्यांना आणि बँकांना वेस्ट्रो खाते उघडायची मुभा दिली. यासाठी सरकारच्या परवानगीची अट काढून टाकली.

मोदी सरकारच्या या ठोस निर्णयामुळे ब्रिक्स समूहातील देश चीन रशिया भारत दक्षिण आफ्रिका त्याचबरोबर सौदी अरेबिया आणि अन्य देश रुपया या चलनामध्ये व्यापार करू शकतील. त्यासाठी अमेरिकन डॉलरची मक्तेदारी त्यांना सहन करावी लागणार नाही. परदेशातल्या बँका आणि भारतातल्या बँका बँक टू बँक असा व्यवहार करू शकतील.

India Ditches USD, Sends Circular To BRICS Granting Full Rupee Access

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात