India Corona Updates : दोन दिवसांनंतर पुन्हा 50 हजारांच्या पुढे कोरोना रुग्णंसख्या, रिकव्हरी रेट वाढून 96.75% वर

India corona Updates now cases rising again more than 50 thousands covid updates

India Corona Updates : दोन दिवसांचा दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या वर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 50,040 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 1258 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी देशात बरे होण्याचा दर वाढून 96.75% झाला आहे. देशात सध्या 5,86,403 सक्रिय रुग्ण आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात किंवा घरांमध्ये उपचार सुरू आहेत. India corona Updates now cases rising again more than 50 thousands covid updates


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दोन दिवसांचा दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या वर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 50,040 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 1258 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी देशात बरे होण्याचा दर वाढून 96.75% झाला आहे. देशात सध्या 5,86,403 सक्रिय रुग्ण आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात किंवा घरांमध्ये उपचार सुरू आहेत.

शनिवारी 48,698 नवीन कोरोना रुग्ण आढळले आणि 1183 संक्रमितांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी 21 जून रोजी 42,640 रुग्ण दाखल झाले होते. दुसरीकडे, काल 64 लाख 25 हजार लसीचे डोस देण्यात आले. त्याचबरोबर आतापर्यंत 32 कोटी 17 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे.

कोरोनाची सद्य:स्थिती

एकूण कोरोना रुग्ण – 3 कोटी 2 लाख 33 हजार 183
एकूण बरे झालेले रुग्ण – 2 कोटी 95 लाख 51 हजार 029
एकूण सक्रिय रुग्ण – 5 लाख 68 हजार 403
एकूण मृत्यू – 3 लाख 95 हजार 751

महाराष्ट्रात 9812 नवीन रुग्ण, 179 मृत्यू

शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 9,812 नवीन रुग्ण नोंदवले गेले आणि संक्रमणामुळे 179 जणांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात संक्रमित होणाऱ्यांची संख्या 60,26,847 आणि मृतांचा आकडा 1,20,881 पर्यंत गेला आहे. मृत्यूच्या 179 नवीन घटनांपैकी 106 गेल्या 48 तासांतील आणि 73 गेल्या आठवड्यातील आहेत. एका दिवसात 8752 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर आतापर्यंत राज्यात, 57,81,551 जण संसर्गमुक्त झाले आहेत. राज्यात सध्या संसर्गमुक्त होण्याचे प्रमाण 95.93 टक्के आहे आणि संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण दोन टक्के आहे.

India corona Updates now cases rising again more than 50 thousands covid updates

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात