वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवरील तणाव काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही देशांच्या सैन्याने गोग्रा या भागातून सैनिकांना मागे हटवण्यावर सहमती दर्शवली आहे. पुढे चर्चा सुरू ठेवण्याचा निर्णय दोन्ही बाजूंनी घेतला आहे तरी सीमेवर इतर ठिकाणी तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे भारतीय सैन्याची सावधगिरीची भूमिका कायम आहे. india – china to disengage from gogra
भारत-चीनमध्ये हिंसक संघर्षानंतर पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षापासून तणावाची स्थिती आहे. बऱ्याच कालावधीनंतर हा तणाव दूर होण्याचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. गोग्रा भागातून मागे हटण्यास दोन्ही देशाचे सैन्य तयार झाले आहे. भारत-चीनदरम्यान १२ व्या फेरीची कमांडर स्तरावर चर्चा झाली. पेट्रोलिंग पॉइंट 17-A वरून मागे हटण्याची तयारी यात दोन्ही बाजूंकडून दर्शवण्यात आली आहे. पूर्व लडाखमधील या पेट्रोलिंग पॉइंटवरून दोन्ही देशांमध्ये तिढा कायम होता.
कोअर कमांडर स्तरावरील चर्चेच्या १२ व्या फेरीत पीपी-१७ ए वरून मागे हटवण्याबाबत दोन्ही देशांच्या सैन्यात करार झाला आहे. पेट्रोलिंग पॉइंट-१६ ए ला गोग्रा नावाने ओळखले जाते. पण फक्त इथून सैनिक मागे हटल्याने पूर्व लडाखमधील दोन्ही देशातील तणाव मिटला असे नाही. कारण अजूनही सीमेवर अनेक ठिकाणी तणावाची स्थिती कायम आहे.
गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर सर्व राजनैतिक आणि सैन्य स्तरावरील चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर दोन्ही देशांनी वादग्रस्त भागातून आपले सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोन्ही देशांचे सैनिक पँगाँग तलावाच्या परिसरात मागे हटले होते. पण उर्वरित वादग्रस्त भागातून मागे हटण्यास चीनचा नकार आहे. या पार्श्वभूमीवर कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या १२ व्या फेरीत चांगली प्रगती झाली आहे. पेट्रोलिंग पॉइंट -15 (हॉट स्प्रिंग) आणि डेपसांग क्षेत्रातील तिढा सोडवण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App