वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सीमाप्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि चीनमधील चर्चेचा २४ वा टप्पा मंगळवारी होणार आहे. यासाठी चीनचे विशेष प्रतिनिधी परराष्ट्रमंत्री वांग यी नवी दिल्लीत पोहोचले आहेत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्याशी बैठक घेतली. जयशंकर म्हणाले की दोन्ही देशांमधील मतभेद वादात बदलू नयेत. यासोबतच, सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी त्यांनी चिनी समकक्षांचे लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याच्या तयारीवर दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी व्यापक चर्चा केल्याचे समजते. India China
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग हे प्रामुख्याने सीमाप्रश्नावरील विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आले आहेत. परंतु त्यांचा उद्देश चीनचे अध्यक्ष जिनपिंग व मोदी यांच्या द्विपक्षीय बैठकीचा अजेंडा निश्चित करणे आहे.
शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी चीनमध्ये जाणार आहेत.२०२०च्या तणावानंतर मोदींचा हा पहिलाच चीन दौरा आहे. ही भेट अशा वेळी होत आहे जेव्हा अमेरिकेने भारतावर ५०% कर लादण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून तेल आयात केल्याबद्दल भारतावर स्वतंत्र दंड लादण्याची धमकीही अमेरिकेने दिली आहे.
पुतीन यांनी मोदींना फोन करून ट्रम्प चर्चेची दिली माहिती
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या शिखर बैठकीची माहिती दिली. गेल्या १० दिवसांत दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी चर्चा होती. पंतप्रधान मोदींनी पुतीन यांच्याशी झालेल्या संभाषणात म्हटले की, युक्रेन युद्धाचा तोडगा संवाद आणि राजनैतिक कूटनीतिद्वारे काढावा, असे भारताचे नेहमीच धोरण राहिले आहे. या दिशेने होणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना भारत पाठिंबा देतो. मोदींनी सोशल मीडियावर लिहिले की, “मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या फोन कॉलची आणि अलास्का येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीची माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App