Operation Sindoor वरून लोकसभेत मार खाल्ला; म्हणून पुन्हा लावून धरला यादीबाह्य मतदारांचा SIR चा मुद्दा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकार खऱ्या अर्थाने घेरण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने अडचणीत आणण्यासाठी किंवा पेचात पकडण्यासाठी विरोधकांकडे कुठला मुद्दाच नसल्याने ऑपरेशन सिंदूरवर तरी सरकारला ठोकून काढू या हेतूने त्या विषयावर चर्चा घेण्यात विरोधक यशस्वी झाले पण ऑपरेशन सिंदूरवरच्या मुद्द्यावर चर्चा करताना विरोधकांनी सरकारवर कुठलेही नवे आरोप केले नाहीत जे आरोप केले, ते जुनेच केले, फक्त जरा नवीन भाषेत केले.

पण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या तगड्या टीमने विरोधकांची सगळी बॉलिंग फोडून काढली. राहुल गांधी, गौरव गोगोई, प्रियांका गांधी, प्रणिती शिंदे, अखिलेश यादव या सगळ्यांची बॉलिंग ढिल्ली पडली.

म्हणून आज राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवरच चर्चा सुरू असताना विरोधकांनी मात्र लोकसभा आणि लोकसभेच्या बाहेर यादी बाह्य मतदारांसाठी धोसरा काढला. सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन special intensive revision अर्थात SIR च्या मुद्द्यावर संसदीय बाहेर निदर्शने केली. त्यामध्ये आज सोनिया गांधी देखील सामील झाल्या. दोनच दिवसांपूर्वी विरोधकांनी यासंदर्भात निदर्शने करून मोर्चा काढला होता. त्यानंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचे कागद काढून कचराकुंडीत टाकले होते. आज पुन्हा त्याच मुद्द्यावर विरोधकांनी आंदोलन केले.

त्यामुळे ऑपरेशन सिंदूरवर मार खाणाऱ्या विरोधकांना दुसरा कुठला हाती मुद्दा लागला नाही म्हणून स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन याच मुद्द्यावर पुन्हा आंदोलन करावे लागल्याचे चित्र निर्माण झाले. आजच्या आंदोलनात फक्त हातातल्या फलकांवरची चित्रे त्यांनी बदलली होती. त्या पलीकडे आजच्या आंदोलनात सुद्धा काही नवीन नव्हते.

INDIA Bloc MPs protest against the Special Intensive Revision (SIR) and the “arrest of labourers in BJP-ruled states”

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात