राहुल गांधींच्या पुढाकाराने सकाळी 300 खासदारांचा दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा; संध्याकाळी खर्गेंची ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टी!!

नाशिक : मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधींच्या पुढाकाराने सकाळी 300 खासदारांचा दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा; संध्याकाळी मल्लिकार्जुन खरेदींची ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टी!!, असे सगळ्या विरोधकांचे राजकारण आज राजधानीत रंगले. भारतातल्या जनतेच्या सगळ्या गंभीर प्रश्नांवर सगळ्या विरोधकांनी मिळून 5 स्टार डिनर पार्टीमध्ये अतिशय गंभीर चर्चा केली.

राहुल गांधींनी मतं चोरीचा मुद्दा लावून धरल्याने सगळ्या विरोधकांची त्यांच्या मागे फरफट झाली. विरोधकांच्या 300 खासदारांना राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली संसद भवन ते निवडणूक आयोग अशा मोर्चात सामील व्हावे लागले. पोलिसांनी मोर्चा अडवल्यामुळे खासदारांना दिल्लीच्या रस्त्यांवर बसावे लागले. त्यामध्ये प्रियांका गांधी यांच्यापासून ते संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत सगळे विरोधी खासदारांचा समावेश होता. पोलिसांनी नंतर त्यांना बस मध्ये भरून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांची सरबराई केली. नंतर खासदारांना सोडून दिले.

– चाणक्यपुरी ताज पॅलेस मध्ये 5 स्टार डिनर पार्टी

दिल्लीच्या रस्त्यावर मोर्चा काढून दमलेले खासदार सायंकाळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलेल्या 5 स्टार डिनर पार्टीला आवर्जून पोहोचले. चाणक्यपुरीतल्या हॉटेल ताज पॅलेस मध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही 5 स्टार डिनर पार्टी दिली. या डिनर पार्टीला काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार, द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी यांच्यासह अनेक बडे नेते हजर राहिले. सोनिया गांधी आणि शरद पवार हे दोन नेते वयाच्या कारणामुळे सकाळच्या रस्त्यावरच्या मोर्चाला हजर नव्हते, पण सायंकाळी येथे ताज पॅलेस हॉटेलमध्ये 5 स्टार डिनर पार्टीला पोहोचले. सकाळच्या मोर्चात सामील झालेले सगळे विरोधी खासदार खर्गे यांच्या 5 स्टार डिनर पार्टीला आवर्जून हजर राहिले. तिथे सगळ्यांनी दिल्लीच्या रस्त्यावरच्या मोर्चाचा श्रमपरिहार केला.

– आधी राहुल गांधींच्या निवासस्थानी डिनर पार्टी

राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनच्या दिवशी त्यांच्या सरकारी निवासस्थानी सगळे बडे नेते जमले होते. त्यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे वगैरे नेत्यांचा समावेश होता. या सगळ्या नेत्यांना आणि खासदारांना राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी डिनर पार्टी दिली होती. यावेळी प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांनी सर्व नेत्यांना राहुल गांधींचे नवे सजवलेले सरकारी घर मोठ्या प्रेमाने दाखविले होते. प्रियांका गांधी यांनी स्वतः लक्ष घालून हे घर सजविल्याचे सोनिया गांधींनी सगळ्यांना सांगितले होते.

राहुल गांधींच्या या सजविलेल्या घरात विरोधी पक्षांच्या सगळ्या नेत्यांनी मतचोरीवर गंभीर चर्चा केली. राहुल गांधींनी केलेले प्रेझेंटेशन बघितले. या प्रेझेंटेशनने प्रभावित झाल्यानंतर सगळे विरोधी खासदार आजच्या सकाळच्या मोर्चामध्ये आणि संध्याकाळच्या 5 स्टार डिनर पार्टीमध्ये आवर्जून हजर राहिलेले आढळले.

INDIA bloc leaders’ dinner hosted by Rajya Sabha LoP and Congress National President Mallikarjun Kharge.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात