भारत बनला युरोपचा सर्वात मोठा इंधन पुरवठादार, युरोपकडून दररोज 3.60 लाख बॅरल शुद्ध इंधनाची खरेदी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : युक्रेनवरील हल्ल्याबाबत अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. यासोबतच त्यातून इंधन खरेदीवरही बंदी घालण्यात आली आहे. तर भारताने अमेरिका आणि युरोपच्या धमक्यांना भीक न घालता रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आता युरोपीय देश भारताकडून तेच रशियन तेल रिफाइंड इंधन म्हणून जास्त दराने खरेदी करत आहेत.India becomes Europe’s largest fuel supplier, Europe is buying more than 3.60 lakh barrels of refined fuel every day

परिस्थिती अशी आहे की, भारतीय तेल शुद्धीकरण कारखान्यांनी युरोपची मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. युरोप भारतामार्फत विक्रमी प्रमाणात रिफाइंड रशियन इंधन खरेदी करत आहे आणि त्याबदल्यात मोठी रक्कम मोजत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यामुळे युरोपीय लोकांना इंधनावरील कराच्या रूपाने आपला खिसा रिकामा करावा लागत आहे. प्रमुख क्रूड विश्लेषक व्हिक्टर काटोना म्हणाले, “सर्व निर्बंध असूनही रशियन तेल युरोपमध्ये परत येत आहे.”



रशियन वायूची चीनकडून युरोपला चढ्या दराने विक्री

इंधन निर्यातीत भारताची भरभराट हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करत आहे. युरोपीय देश चीनकडून जो एलएनजी खरेदी करत आहेत, तो रशियाचा असून तो चीन स्वस्तात खरेदी करून चढ्या भावाने विकत असल्याचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उघड झाले होते. आता भारत पेट्रोल आणि डिझेलमध्येही तेच करत आहे. ब्लूमबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे की, रशियन तेल अजूनही भारताच्या मदतीने युरोपच्या ऊर्जेची गरज भागवत आहे.

भारतातून निर्यात 2 लाख बॅरल प्रतिदिन

भारतातून युरोपातील रिफाइंड इंधनाची आयात दररोज 3.60 लाख बॅरलच्या जवळपास आहे. एप्रिलमध्ये भारतात रशियन कच्च्या तेलाची आवक 200 दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त असू शकते, जी एकूण तेल आयातीच्या 44% आहे. यापूर्वी भारतातून युरोपीय देशांमध्ये दररोज 1.54 लाख बॅरल जेट इंधन आणि डिझेल निर्यात केले जात होते, ते आता 2 लाख बॅरल झाले आहे.

युरोपियन युनियनची डिसेंबरमध्ये रशियन कच्च्या तेलावर बंदी

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये युरोपियन युनियनने रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घातली होती. हे निर्बंध भारतासारख्या देशांना स्वस्त रशियन क्रूड खरेदी करण्यापासून डिझेलसारख्या इंधनात रूपांतरित करण्यापासून आणि युरोपियन देशांना परत विकण्यापासून रोखत नाहीत. Repsol SA चे CEO जोसू जॉन इमाझ म्हणतात की, रशियन डिझेल बेकायदेशीरपणे युरोपमध्ये जात आहे आणि ते थांबवण्याची गरज आहे.

India becomes Europe’s largest fuel supplier, Europe is buying more than 3.60 lakh barrels of refined fuel every day

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात