लो स्कोअरिंग मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाला सलग नमवून भारत गावस्कर – बॉर्डर ट्रॉफी विजेता!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवत विजय मिळवला आहे. या लो स्कोअर मॅच मध्ये दोन्ही संघ बलाढ्य वाटण्यापेक्षा प्राथमिक अवस्थेतले वाटले. india beat Australia in straight sets in a low-scoring match to win the Gavaskar-Border Trophy

भारताचा या कसोटी मालिकेतील सलग दुसरा विजय असून कांगारूंनी विजयासाठी दिलेले 115 धावांच आव्हान भारताने पूर्ण केले. आहे. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताने कसोटी मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली असून पुढच्या दोन्ही कसोट्या भारताने गमावल्या तरी भारत गावस्कर बॉर्डर ट्रॉफी गमवणार नाही. फार तर ऑस्ट्रेलियाबरोबर ही ट्रॉफी शेअर करेल. पण पुढच्या दोन कसोटी सामान्यांपैकी एक कसोटी सामना जिंकला तरी भारत सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी स्वतःकडे राखण्यात यश मिळवेल.

नागपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणेच दिल्ली येथील कसोटी सामन्यातही भारताने तिसऱ्याच दिवशी विजय मिळवला. काल दुसऱ्या दिवसाच्या अंती ऑस्ट्रेलियाने 1 बाद 61 धावा करत 62 धावांची आघाडी घेतली होती. परंतु तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताच्या घातक गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज टिकू शकले नाहीत. सुरुवातीच्या षटकात भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने ट्रॅव्हिस हेडला आणि स्टीव्हन स्मिथ या फलंदाजांचा बळी घेऊन त्यांना तंबूत धाडले.

अश्विननंतर रवींद्र जडेजाने आपला धडाका सुरु केला. त्याने एकामागोमाग एक अशा 7 फलंदाजांची विकेट घेतली. त्यापैकी पीटर हँड्सकॉम्ब पॅट कमिन्स यांना लागोपाठ तर शून्यावर बाद केले.  भारताच्या भेदक गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 113 धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 1 धावांची आघाडी मिळून तर दुसऱ्या डावात 113 धावा करत भारतासमोर विजयासाठी 115 धावांच आव्हान ठेवले.

ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान पूर्ण करताना भारतीय संघाची सुरुवात देखील खराब झाली. भारताचा उपकर्णधार के एल राहुल केवळ एक धावा करून बाद झाला. तर त्यापाठोपाठ रोहित शर्मा देखील 31 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने भारताच्या धाव संख्येत 20 धावांचे योगदान दिले. तर श्रेयस अय्यर 12 धावा करून बाद झाल्यानंतर भारताचा डाव सावरू पाहणाऱ्या चेतेश्वर पूजाराला श्रीकरने साथ दिली. चेतेश्वर पुजाराने नाबाद 31 तर श्रीकरने नाबाद 23 धावा करून ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान पूर्ण करून भारताला विजय मिळून दिला.

india beat Australia in straight sets in a low-scoring match to win the Gavaskar-Border Trophy

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात