इंडिया आघाडीत बिघाडी, काँग्रेस आणि तृणमूलमध्ये जागावाटपाचा वाद, अधीर रंजन म्हणाले- ममता बॅनर्जी मोदींना खुश करण्यात व्यग्र, त्यांना आघाडी नको!!

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागांचे प्रामाणिकपणे वाटप न केल्याचा आरोप केला आहे. त्यावरून त्यांचे खरे हेतू समोर आले असल्याचे अधीर रंजन चौधरी म्हणालेत.India Alliance News, Congress Vs TMC, seat sharing dispute In West Bengal, Adhir Ranjan On Mamata Banerjee

अधीर म्हणाले की, ममता सध्या पंतप्रधान मोदींना खूश करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना आघाडीचे राजकारण करायचे नाही. त्यांनी आघाडीचे राजकारण केले, तर पंतप्रधान मोदी नाराज होतील. आणि ममता दीदी असे काही करत नाहीत ज्यावर मोदीजी रागावतील.



ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही– अधीर

अधीर म्हणाले की, ममता बॅनर्जी राज्यात काँग्रेसला 2 जागा देणार असल्याचे सांगत आहेत. या दोन जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तिथे काँग्रेसचे खासदार आहेत. मग ममता बॅनर्जी आपल्याला काय नवीन देत आहेत? ममता बॅनर्जी आणि भाजपचा पराभव करून आम्ही या दोन जागा जिंकल्या आहेत.

आम्हाला या जागा देऊन ममता बॅनर्जी आमच्यावर काही उपकार करत आहेत का? आता त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? निवडणूक जिंकण्यासाठी ममतांना काँग्रेसची गरज आहे. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवून अधिक जागा जिंकण्यास सक्षम आहे. आम्ही त्यांना दाखवू. या दोन जागा राखण्यासाठी आम्हाला ममतांच्या दयेची गरज नाही.

जागावाटप हे आघाडीसाठी आव्हानात्मक

2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि आघाडीतील 28 पक्षांमधील जागावाटप हे मोठे आव्हान ठरू शकते. लोकसभेत काँग्रेसनंतर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या पक्षाची भाजपशी थेट स्पर्धा असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही सांगितले की, लोकसभा निवडणुकीत शिवसेना दादरा आणि नगर हवेलीसह 23 जागांवर निवडणूक लढवत आहे आणि ती जोरदारपणे लढणार आहे. या दोन विधानांनंतर काँग्रेसला जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवणे सोपे जाणार नाही.

India Alliance News, Congress Vs TMC, seat sharing dispute In West Bengal, Adhir Ranjan On Mamata Banerjee

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात