काँग्रेस म्हणे मोदी घाबरले!!, पण युपीए नाव सोडावे लागले आणि “इंडिया” नाव पुसत चालले त्याचे काय??, हा खरं म्हणजे काँग्रेसला सवाल विचारण्याची गरज आहे. India against Bharat : Congress claims Modi frightened, but I.N.D.I.A in real trouble of erasing the name itself
इंडिया विरुद्ध भारत या लढाईत जी 20 च्या निमंत्रण पत्रिकेवर “प्रेसिडेंट ऑफ भारत” लिहिल्याबरोबर काँग्रेस सह विरोधकांचे कान उभे राहिले. काँग्रेसने एक नॅरेटिव्ह पसरायला सुरुवात केली, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी “इंडिया” आघाडीला घाबरले आणि त्यामुळे त्यांनी इंडिया ऐवजी भारत नावाचा वापर सुरू केला. यह डर अच्छा है, असे ट्विट काँग्रेसचे एक प्रवक्ते पवन खेडा यांनी केले. काँग्रेसचे दुसरे प्रवक्ते जयराम रमेश यांनी तर हा भारताच्या संघराज्यावरचा हल्ला आहे, असा कांगावा सुरू केला.
पण इंडिया विरुद्ध भारत या लढाईचे खरे इंगित काँग्रेसने कांगावा केल्याप्रमाणे खरंच आहे का??, याचा वास्तववादी विचार केला तर तो बिलकुलच नाही, असे म्हणावे लागेल!!
यूपीए नाव बदनाम
कारण आज ज्या आघाडीने “इंडिया” नाव धारण केले आहे, त्या आघाडीचे पूर्वीचे नाव यूपीए होते म्हणजे “युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स” असे होते. पण यूपीए राजवटीच्या 10 वर्षांच्या काळात ते नाव भ्रष्टाचाराशी एवढे जोडले गेले आणि त्यामुळे बदनाम झाले की यूपीए हे नाव अखेरीस काँग्रेस प्रणित आघाडीला टाकून द्यावे लागले. पण हे नाव टाकून द्यावे लागण्यात 2010 पासून भाजपने सुरू केलेले भ्रष्टाचार विरोधातले आंदोलन कारणीभूत ठरले होते. त्यात अण्णा हजारेंचे दिल्लीतले आंदोलन उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरले होते.
2014 मध्ये यूपीए आघाडीची सत्ता गेली. पण यूपीए आघाडीचे बदनाम नाव कायम राहिले आणि 2019 मध्ये देखील त्या आघाडीला बसायचा तो फटका बसलाच. त्यानंतरही त्या आघाडीतले नेते ते नाव टाकायला तयार नव्हते. पण 2023 मध्ये मात्र सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालच्या काही “सजग” नेत्यांना “नवी जाग” आली आणि त्यांना युपीए नाव आणि भ्रष्टाचार हे एकमेकांपासून तुटू शकणार नाही याची जाणीव झाली. त्यामुळे मग सोनिया गांधीं भोवतीच्या थिंक टँकने यूपीए नाव टाकून द्यायचा सल्ला दिला आणि सोनिया गांधींना तो मानावा लागला. त्यामुळे यूपीए नाव सोडून काँग्रेस प्रणित आघाडीने “इंडिया” आघाडी हे नाव धारण केले. म्हणजेच मूळात स्वतःचे आधीचे लाडके नाव, बदनामीमुळे टाकावे लागले ही वस्तुस्थिती त्यामुळे अधोरेखित झाली.
ते काही का असेना, पण निदान यूपीए हे नाव 20 वर्षे तरी टिकले आणि त्या आघाडीने 10 वर्षे सत्ताही गाजवली, पण “इंडिया” आघाडीचे नामकरण होताच ते नाव पुसण्याची पाळी आली हे काँग्रेसचे खरे राजकीय दुखणे आहे.
एक तर “इंडिया” हे नाव विदेशी आहे. काँग्रेसच्या आधारस्तंभ असलेल्या नेत्या विदेशी आहेत. त्यामुळे हे दुहेरी दुखणे यूपीए आघाडीने “इंडिया” हे नाव धारण करून स्वतःवर ओढवून घेतले. काँग्रेसची खरी गोची ही आहे!!
2024 च्या लोकसभा निवडणुका अजून निवडणुका आठ महिने लांब आहे. “इंडिया” आघाडीच्या फक्त तीन बैठका झाल्या आहेत. पण नेता ठरला नाही आणि संयोजकही सापडला नाही. फक्त समन्वय समिती स्थापन करण्यावर भागवावे लागले. पण ही समिती स्थापन होते ना होते, तोच “इंडिया” आघाडीचे नाव पुसण्याची वेळ आली. त्यामुळे काँग्रेसच्या पोटात गोळा आला आहे… आणि काँग्रेसचे नेते मोदी घाबरल्याचा डंगोरा पिटत आहेत, ही यातली “राजकीय मेख” आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App