नाशिक : इकडे महाराष्ट्रात महायुती फुटण्याकडे डोळे लावून बसले; तिकडे झारखंडमध्ये Indi आघाडीच्या पायाचे दगड हादरले!!, असेच राजकीय चित्र आज दिसून आले.
महाराष्ट्रातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष स्वतंत्रपणे लढले किंवा स्वतःला हव्या तशा युत्या आणि आघाड्या करून लढले. राज्य सरकार मधली एकसंध महायुती अनेक पातळीवर अनेक ठिकाणी फुटली. पण त्याच काडीचा आधार घेऊन अनेक जण राज्य सरकार मधली महायुती फुटण्याकडे डोळे लावून बसले. अनेकांनी महायुती फुटण्याच्या तारखा जाहीर केल्या. सरकार पडण्याचे मुहूर्त काढून बसले.
– 2029 मध्ये पण महायुती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती तुटणार नाही. स्थानिक पातळीवर काही घडले, तरी त्याचा सरकारवर परिणाम होणार नाही, असे वारंवार सांगून सुद्धा माहिती फुटण्याच्या आशा पल्लवीत राहिल्या. पण प्रत्यक्षात त्या आशांवर पाणी फेरले गेले. कारण मुंबई सकाळला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी 2029 ची विधानसभा निवडणूक सुद्धा महायुती करूनच लढविण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लिबरल लोकांची निराशा झाली.
22 ठिकाणच्या निवडणूक गोंधळाचा सर्व 288 गावांमधल्या निवडणुकांना फटका; सगळ्यांचाच निकाल पुढे ढकलला!!
– झारखंडमध्ये Indi आघाडी फुटायच्या बेतात
पण इकडे महाराष्ट्रात किरकोळ स्थानिक निवडणुकांच्या निमित्ताने महायुती फुटण्याकडे डोळे लावून बसलेल्यांचे असे “वांगे” होत असताना तिकडे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे परिणाम होऊन झारखंडमध्ये काँग्रेस प्रणित Indi आघाडीच्या पायाचे दगड हादरले. झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल यांचे संबंध बिघडले. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात आले. त्यांनी दिल्लीचा दौरा करून भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. त्यांच्या पाठोपाठ झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे झारखंडमध्ये राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली.
– बिहार निकालांचा परिणाम
झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांचा पाठिंबा आहे. हेमंत सोरेन यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्याकडे फक्त 7 जागा मागितल्या होत्या. पण तेवढ्या कमी जागा सुद्धा दोन्ही पक्षांनी नाकारल्या होत्या. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चाने बिहार विधानसभेची निवडणूक लढविली नाही. ते बिहारमध्ये शांत बसले. पण निवडणुकीनंतर हेमंत सोरेन यांनी त्याचा हिसका झारखंडमध्ये दाखविला. झारखंड मधल्या सत्ताधारी आघाडीतून काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला बाहेर काढण्याची तयारी चालविली त्या तयारीचा भाग म्हणूनच भाजपशी नवी आघाडी करायची तयारी दाखविली. त्यामुळे झारखंडमध्ये Indi आघाडीच्या पायाचे दगड हादरले. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांना सत्तेबाहेर जायची वेळ येऊन ठेपली.
महाराष्ट्रात महायुती फुटण्याकडे डोळे लावून बसलेल्या झारखंडमध्ये अशा काही घडामोडी घडतील आणि तिथे आपला टांगा पलटी होऊन घोडे फरार होतील, याची साधी भनक सुद्धा लागू शकली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App