नवाब मालिक, अबू आझमींचीही जीभ घसरली; म्हणाले, स्वतःची मुले नसणारे मुलींच्या लग्नाचे वय ठरवतात!! Increased the age of marriage of girls
प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारने मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याचे विधेयक संसदेत संमत करून घेतल्यानंतर त्यावरून नवाब मलिक, अबू आझमी तसेच उत्तर प्रदेशातील काही नेत्यांच्या जेव्हा जीभा घसरल्या आहेत. यामध्ये आता समाजवादी पक्षाचे खासदार शफिक उर रहमान बर्क यांची भर पडली आहे. केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय वाढविल्याने त्या अधिक बिघडत जातील, असे बेताल वक्तव्य शफिक उर रहमान बर्क यांनी केले आहे.
शफिक उर रहमान बर्क हे यापूर्वी देखील आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत. बाबरी मशीद पुन्हा बांधण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याच बरोबर मुसलमानांसाठी शरीयत कायदा लागू करण्याची ही मागणी त्यांनी संसदेत लावून धरली होती. एकापाठोपाठ एक अशा वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांनी थेट महिला आणि मुलींवर त्या बिघडल्याचा आरोप करून घेतला आहे. मुलींच्या लग्नाचे वय वाढल्याने त्या जास्त बिघडतील. सोशल मीडिया वापरून त्या आधीच बिघडल्या आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
– मलिक आझमी देखील असेच बरळले!!
ज्यांची लग्न झालेली नाहीत ते मुलींच्या लग्नाचे वय ठरवत आहेत, असे टीकास्त्र राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती. त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर होता. मलिक यांच्या नंतर आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची जीभ घसरली आहे. ज्यांना स्वतःची मुले नाहीत, ते लोक मुलींच्या लग्नाचे वय ठरवत आहेत, असा बेछूट आरोप अबू आझमी यांनी केला आहे. मूळात मुलींच्या लग्नाचे वय वगैरे असे नियमच नकोत. कोणाचे केव्हा लग्न लावून द्यायचे ही ज्याची त्याची कुटुंबे ठरवतील, असे बेताल विधानही त्यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशात खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एएमआयएम पक्षाच्या नेत्यांनी तर मुसलमानांची संख्या लोकसंख्या वाढवा तरच ओवैसी साहेब पंतप्रधान होऊ शकतील आणि शफी कुरेशी साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकतील, अशी बेताल वक्तव्ये केली आहेत. मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्याच्या मुद्द्यावर सर्वाधिक प्रतिकूल प्रतिक्रिया भारतातल्या मुस्लीम नेत्यांच्या आल्याचे दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App