नुसते मोदी – योगींच्या नावांवर अवलंबून राहू नका, संघटना वाढवा; बी. एल. संतोष यांनी घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!


प्रतिनिधी

लखनौ : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजप आणि बाकीचे विरोधी पक्ष जोरदार करत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांचा भर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वल प्रतिमेवर आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी मात्र भाजपच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा चांगलाच क्लास घेतला आहे. केवळ  मोदी – योगींच्या नावावर अवलंबून राहू नका. भाजप पक्ष संघटना वाढवा, तरच निवडणुकीत उपयोग होईल, असा स्पष्ट इशारा बी. एल संतोषी यांनी उत्तर प्रदेशात कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये दिला. increase organization; B. L. Santosh took the class of BJP workers

भाजप संघटन वाढवण्यासाठी महिला, ओबीसी, दलित, आदिवासी, समाजातील वेगवेगळे समुदाय यांना जोडून घ्या. जमिनीवर उतरून प्रत्यक्ष कार्य करा. माला आणि माईक म्हणजे केवळ हार तुरे आणि भाषणे यांच्यापासून दूर राहा. प्रत्यक्ष कामावर भर द्या. कारण त्याशिवाय निवडणुकीत यश मिळणार नाही, असा परखड सल्ला बी. एल. संतोष यांनी उत्तर प्रदेश मधल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे काम आणि त्यांची प्रतिमा निश्चितच उजज्वल आहे. यात कोणतीही शंका नाही. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केवळ त्यांच्या प्रतिमांवर अवलंबून राहता कामा नये. त्यापलीकडे जाऊन समाजाच्या सर्व स्तरांमध्ये भाजपचे संघटन वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असा स्पष्ट इशारा देखील बी. एल. संतोष यांनी दिला.

– एनडीए विस्तारावर भर

देशभरात 26 पक्षांची विरोधी पक्षांची “इंडिया” आघाडी तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात “एनडीए” विस्ताराची मोहीम हाती घेतली आणि त्यानुसार 39 पक्षांची पहिली बैठक दिल्लीत झाली.

– भाजप विस्तारावर भर

त्याचवेळी त्या प्रयत्नांना समांतर व्यवस्था म्हणून भाजपने स्वतःची पक्ष संघटना वाढविण्याचा प्रयत्न देशभर सुरू केला आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून संघटन सचिव संतोष यांनी उत्तर प्रदेश मध्ये नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विविध बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्ये भाजप संघटना विस्ताराच्या टिप्स देताना त्यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांवर अवलंबून राहून चालणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिल्याने भाजपने 2024 च्या निवडणुका किती गांभीर्याने घेतल्या आहेत आणि किती बारकाईने नियोजन सुरू आहे, याचे प्रत्यंतर आले.

increase organization; B. L. Santosh took the class of BJP workers

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*