अयोध्येत श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, रेल्वे स्थानकाचेही लोकार्पण!!

विशेष प्रतिनिधी

अयोध्या : रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येत असतानाच अयोध्येतल्या विकासकामांनाही प्रचंड वेग आला आहे. अयोध्येतल्या श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 डिसेंबरला होत आहे. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी अयोध्या रेल्वे स्थानकाचेही लोकार्पण करतील. Inauguration of Shri Ram International Airport in Ayodhya on December 30 by Prime Minister Modi

3 मूर्ती तयार

श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीरामाच्या बालस्वरूपाची कोणती मूर्ती विराजमान होणार याचा निर्णय 29 डिसेंबरला होणार आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी 3 मूर्ती तयार केल्या आहेत. कांचीचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वतींच्या सूचनेनुसार श्री ट्रस्टची टीम एक मूर्ती निवडणार आहे. दुसरी उत्सवमूर्ती म्हणून निवडली जाईल. तिसरी मूर्ती कुठे ठेवायची हा निर्णयही शुक्रवारी होईल. मे २०२३ पासून अयोध्येत तिन्ही मूर्ती घडवल्या जात आहेत. हे काम राजस्थानचे शिल्पकार सत्यनारायण पांडे आणि कर्नाटकचे गणेश एल यांनी केले. भट्ट आणि योगिराज कोरीव काम करत आहेत.

सत्यनारायण यांचे पुत्र प्रशांत पांडे म्हणाले, आम्ही तीन पिढ्यांचे ज्ञान आणि अनुभव श्री रामलल्लांच्या मूर्तीसाठी पणाला लावला. रामनवमीला श्री रामलल्लांच्या कपाळावर सूर्यकिरणे पडतील अशा प्रकारे मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. तीनपैकी एक मूर्ती पांढऱ्या संगमरवरी व इतर दोन कर्नाटकातील काळ्या दगडापासून बनवल्या आहेत. काशीचे अभ्यासक पं. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली २१ वैदिक विद्वान प्राणप्रतिष्ठा विधी पार पाडतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला अयोध्येत 15 किलोमीटर लांबीचा रोड शो करणार आहेत. त्यात 2 लाखांहून अधिक लोक जमण्याची शक्यता आहे. मोदी सर्वप्रथम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. त्यानंतर हा ताफा राष्ट्रीय महामार्ग-२७ मार्गे धरमपथला पोहोचेल. त्यानंतर तो रामपथमार्गे अयोध्या धाम रेल्वेस्थानकावर जाईल. तेथे लोकार्पणाचा कार्यक्रम होईल.

मूर्ती कशी असेल?

गाभाऱ्यात बसवण्यात येणाऱ्या मूर्तीचे स्वरूप ५ ते ८ वर्षांच्या मुलाचे असेल. मूर्ती कमळावर विराजमान होईल.

स्थापना कोणत्या मुहूर्तावर

काशीचे विद्वान पंडित गणेश्वर शास्त्री यांनी श्री राम नक्षत्र पुनर्वसू लक्षात घेऊन शुभ मुहूर्त ठरवला आहे. ते म्हणतात, २२ जानेवारीला १२:२९ वाजून ८ सेकंदांना स्थापना होईल. मृगशीर्ष नक्षत्र सूर्याच्या अभिजितमध्ये असल्यामुळे शुभ राहील. गुरू अनुकूलतेमुळे नवांशामध्ये उंचीचा असेल. १६ वर्गांपैकी १० वर्गही शुभ आहेत. सूर्य मकर राशीत असल्यामुळे पौष महिन्याचा दोष नसेल. या मुहूर्ताला कालसर्प दोषाची स्थितीही राहणार नाही, असेही पं. गणेश्वर शास्त्री यांनी स्पष्ट केले.

यजमान मोदी शरयूमध्ये स्नान करणार, येथूनच अनुष्ठान सुरू

६ जानेवारी : यजमानांकडून (पंतप्रधान नरेंद्र मोदी) प्रायश्चित्त, शरयू तीरावर दशविध स्नान, गणेशपूजा, विष्णूपूजा आणि गोदान होईल.

१७ जानेवारी: यजमान आणि आचार्य भव्य पंचकोशी परिसरात श्री रामलल्लांच्या मूर्तीसह मिरवणूक काढणार आहेत. शरयूतून पाणी आणले जाईल.

१८ जानेवारी : गणेश अंबिका, वरुण, मातृकापूजा, ब्राह्मण वरण, वास्तुपूजा होतील. यामध्ये गाभाऱ्यात श्री रामाच्या वेदीसह वास्तुवेदी, योगिनी वेदी आणि क्षेत्रपाल भैरव वेदी बांधल्या जातील. त्यांची पूजा.

१९ जानेवारी : अग्निस्थापना (अरणी मंथन), नवग्रह स्थापना आणि हवनद्वारे अग्नी प्रकट होईल.

२० जानेवारी : गाभारा शरयूचे पाणी भरलेल्या ८१ कलशांनी धुतल्यानंतर वास्तुशांती व अन्नाधिवास विधी होईल. यात श्री रामलल्लांची मूर्ती प्रथम पाण्यात, नंतर अन्न, फुले, फळांमध्ये ठेवली जाईल.

२१ जानेवारी : १२५ कलशांसह मूर्तीचे दिव्य स्नान.

२२ जानेवारी : मृगाशीर्ष नक्षत्रात ११:३० ते १२:३० या वेळेत गर्भगृहात मूर्ती असेल. येथे रामलल्लांसोबत चार भाऊ आणि बाल हनुमान बसतील.

Inauguration of Shri Ram International Airport in Ayodhya on December 30 by Prime Minister Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात